वर्धा: केंद्र शासनाची अग्निवीर योजना चांगलीच गाजली. त्यावर तर्कवितर्क व्यक्त होत असतातच. मात्र शासनाचे कार्य सुरू आहेच. आता भारतीय वायुसेनेने अग्नीवीरवायू भरती प्रक्रियेस प्रारंभ केला आहे. १७ जानेवारीपासून नोंदणी सुरू होणार आहे. या सेवेत दाखल होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ६ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी अग्निपथवायु डॉट सीडीएसी डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ऑनलाईन परीक्षा १७ मार्चपासून सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विज्ञान शाखेतील उमेदवारांनी केंद्रीय, राज्य अथवा केंद्र शासित प्रदेश प्रशासनद्वारे मान्य शिक्षण मंडळातून गणित, भौतिकशास्त्र, इंग्रजी या विषयांसह इयत्ता बारावी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.त्यांना परीक्षेत एकूण किमान पन्नास टक्के आणी इंग्रजीत पन्नास टक्के गुण असावेत. तसेच उमेदवारांचा जन्म २ जानेवरी २००४ ते २ जुलै २००७ दरम्यान झालेला असावा.

हेही वाचा… वंचित आघाडीचे ‘नवे वर्ष, नवे खासदार’ नेमका प्रकार काय? फलकबाजीची राजकीय वर्तुळात चर्चा

उमेदवार निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार करीत असल्यास , नाव नोंदणीच्या तारखेनुसार उच्च वयोमर्यादा २१ वर्ष असावी. निवड प्रक्रियेत ऑनलाईन प्रक्रियेचा समावेश होतो. फेज १ व फेज २ च्या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय तपासणी होणार. परीक्षेसाठी नोंदणी करतांना उमेदवारांना ५५० रुपये अधिक जीएसटी ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian air force has started the recruitment process for fire fighters pmd 64 dvr
Show comments