वर्धा : मित्रपक्षांस न सोडता वर्धेची जागा काँग्रेसनेच लढावी म्हणून आग्रही असणाऱ्या जिल्हा काँग्रेस नेत्यांना प्रदेश नेत्यांचा एक निर्णय झटका देणारा ठरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत ५ मार्चला एक बैठक बोलाविण्यात आली आहे. मुंबईच्या टिळक भवनात होणाऱ्या या बैठकीत बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित राहणार. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा या बैठकीत घेतल्या जाणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे कळवितात.
हेही वाचा : “राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही”, आनंदराव अडसूळ म्हणाले…
यात विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, रामटेक, नागपूर, अमरावती, अकोला या मतदारसंघाचा उल्लेख असून बुलढाणा व वर्धा हे मतदारसंघ अजेंड्यावर नाहीत. उर्वरित मध्ये हिंगोली, नांदेड, लातूर, जालना, धुळे, नंदुरबार, धुळे,कोल्हापूर, पुणे,सांगली, सोलापूर, भिवंडी हे मतदारसंघ आहेत. आघाडीच्या चर्चेत अकोला वंचित बहुजन आघाडीस सोडण्याची जोरदार चर्चा आहे. मात्र तो काँग्रेसने चर्चेत घेतला. या घडामोडीमुळे काँग्रेसजन रडवेले झाल्याचे दिसून येते. करण वर्धा काँग्रेसनेच लढावा म्हणून जोरदार मोर्चे्बंधणी सुरूच आहे. त्यात त्यांनी हा मतदारसंघ काँग्रेस लढेल. प्रसंगी दिल्लीत ही बाब उपस्थित करू, असे ठोस आश्वासन रमेश चेनन्नीथला तसेच नाना पटोले यांनी दिले होते. मात्र ही बैठक आश्वासन पाळणारी दिसत नसल्याने स्थानिक नेते संतप्त झाले आहेत.
हेही वाचा : येत्या २४ तासांत राज्यासह देशभरात अवकाळी पावसाची हजेरी
लढण्यास प्रबळ इच्छुक समजल्या जाणारे एक नेते शैलेश अग्रवाल हे म्हणतात की मुंबईतच निर्णय होणार, असे नाही. आम्ही दिल्लीत बाजू मांडणार. ज्यांना असे वाटते की वर्धेची जागा काँग्रेस पक्षानेच लढावी, ते आमच्यासोबत दिल्लीत येतील. ज्यांना वाटते की न लढलेलेच बरे, ते येणार नाही. काँग्रेसने वर्धा का सोडावे, असा सवाल अग्रवाल यांनी केला. तर जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर म्हणाले की वर्धा काँग्रेसीनेच लढावी असा ठराव करून तो प्रदेश तसेच राष्ट्रीय नेत्यांना पाठविला आहे.या बैठकीत वर्धेचा उल्लेख नाही. त्यामुळे काही समजायला मार्गदर्शन नाही, असा हताश सूर दिसून आला.