वर्धा: आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला गेले पाहिजे, ही प्रत्येक मुस्लिम बंधू भगिनीची ईच्छा असते.जन्म सफल झाल्याची भावना असते.अशी ईच्छा पुर्ण करुन भारतात परत येण्याच्या वाटेवर असणारे काही मात्र परतीच्या प्रवासात नाराज झाले आहेत.कारण त्यांचा प्रवास एक दिवस लांबला आहे.ते आता १७ ऐवजी १८ जुलै रोजी भारतात दाखल होणार.परतीच्या प्रवासात असलेले ईक्राम हुसेन सांगतात की प्रवास एक दिवस लांबणार हे आम्हास वेळेवर सांगण्यात आले.त्याचे कारण पण दिले नाही.इकडे अरेबिक भाषा चालते.त्यामुळे संवाद साधता आला नाही. विमान प्रवास व्यवस्थापनाने नोटीस लावून टाकली व मोबाईलवर मेसेज टाकून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यामुळे आफतच झाली आहे.एकत्र आज येणाऱ्या पैकी शंभरावर बंधू १८ ला निघतील.रविवारी जे नागपूरात पोहचले ते प्रामुख्याने मध्यप्रदेशातील छिंडवाडा, बैतूल,सिवनी येथील आहेत.ताटातूट झाल्याचा नाराजीचा सुर हुसेन यांचा होता.उर्वरित सुरळीत पार पडल्याचे ते म्हणाले.सात जूनला नागपुरातून हे यात्रेकरू सौदी अरेबिया साठी निघाले होते. जेदाह विमानतळावरून सगळ्यांना मक्का शरीफ येथे नेण्यात आले.इथे काही औपचारिकता पूर्ण केल्यावर मीना येथे पोहचले.इथे पाच दिवसाचे हज करविण्यात आले.आठ दिवस पूर्वीच मदिना इथे आणण्यात आले.मदिनात आठ दिवसात चाळीस नमाज पूर्ण झाल्यावर परतीचा प्रवास सुरू झाल्याचे हुसेन म्हणाले.