नागपूर : भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले. दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव केला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. रोहित शर्माने ७६ धावा करत सामन्याचा सामनावीर ठरला. या विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद तिसऱ्यांदा पटकावणारा पहिला संघ ठरला. यासह भारताने गेल्या १० महिन्यात दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकत ट्रॉफी आपल्या नावे केली. भारतीय संघाच्या विजयाचे खास नागपूर कनेक्शनही आहे.

नागपूरमध्ये लागले क्रिकेटचे वेड

टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आणि नुकताच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा याचं क्रिकेट प्रवासात नागपूरचं एक खास स्थान आहे. मुंबईकर म्हणून ओळखला जाणाऱ्या रोहितचा जन्म नागपूरमध्ये झाला. त्यामुळे त्याचा नागपूरशी असलेला ऋणानुबंध फार जुना आहे. रोहित शर्माच्या आईचे माहेर नागपूर आहे. रोहितचा जन्म नागपूरच्या शासकीय रुग्णालयात झाला. त्यामुळे त्याचे या शहरावर विशेष प्रेम आहे. रोहितच्या कुटुंबाची मुळं विदर्भातली आहेत. त्याचे आजोबा-आजीकडील मूळ गाव हे नागपूरजवळचे आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात तो नागपूरला आजीकडे राहायला यायचा. नागपूरच्या उन्हाळ्यात तो गल्ली क्रिकेट खेळायचा आणि क्रिकेटचे वेड तिथेच अधिक वाढले.

छायाचित्रातून बालपण आठवते

अलिकडेच इंग्लड संघाविरोधातील सामन्यासाठी रोहित शर्मा नागपूरमध्ये आला असता, त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. नागपूरमधील बालपणातील खूप आठवणी आहेत. आताही नागपूरमध्ये अनेक नातेवाईक राहतात. जुनी छायाचित्रे बघितल्यावर बालपण पुन्हा आठवते. नागपूरच्या मैदानावर सामना खेळणे कायम आनंदाची बाब असते. पुन्हा एकदा नागपूरच्या धर्तीवर सामना खेळण्याची संधी मिळत असल्याने या संधीचे सोने करू, असा विश्वास रोहितने व्यक्त केला होता. रोहित शर्माच्या आईचे माहेर नागपूर आहे. रोहितचा जन्म नागपूरच्या शासकीय रुग्णालयात झाला होता. रोहितने नागपूरमध्ये आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. १० ऑक्टोबर २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने ७९ धावा केल्या होत्या. १ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने १०९ चेंडूत १२५ धावा करत सामनावीर पुरस्कार जिंकला. कोहलीने या सामन्यात ३९ धावा काढल्या होत्या. रोहितने नागपूरमध्ये एकूण 3 डाव खेळले आहेत. एकदा तो शून्य धावांवरही बाद झाला आहे.

Story img Loader