नागपूर : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाला आहे. नुकतेच त्यांनी पुणे विद्यापीठासंदर्भात केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. शुक्रवारी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (व्हीएनआयटी) ‘भारतीय ज्ञान परंपरा : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनावर’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. पंडित म्हणाल्या, जवाहरलाल नेहरू यांनी प्रसिद्ध्र इतिहासकार आर.सी. मुजुमदार यांना बाजूला केले होते. मुजूमदार यांनी भारतीय ज्ञान परंपरेवर अनेक तथ्य मांडले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत हा जगातील सर्वात श्रेष्ठ सभ्यता असलेला देश आहे. परंतु, मुगल, ब्रिटिश आणि पंडित जवाहरलाल नेहरुंच्या काळातही भारतीय ज्ञान परंपरेला छेद देत ती मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला. नेहरुंच्या काळात भारतीय ज्ञान परंपरेतील तथ्य मांडणाऱ्या आर.सी. मुजुमदार यांना बाजूला केले. संस्कृत ही केवळ ब्राह्मणांची भाषा आहे असे सांगून तिचा तिरस्कार करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास न शिकवता औरंगजेब कसा चांगला होता हा इतिहास शिकवला गेला. त्यामुळे मुगल काळापासून ते स्वातंत्रोत्तर काळापर्यंत भारतीय ज्ञान परंपरेला छेद देत ती मलिन करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे आमचे मूळ ज्ञान येणाऱ्या पिढीला देण्यासाठी शिक्षकांनी प्रत्येक भाषेत नव्याने लिखान सुरू करावे, असे आवाहनही डॉ. पंडित यांनी केले.

‘जेएनयू’मध्ये भाजप चालणार नाही

भारतीय ज्ञान परंपरेला भाजपसोबत जोडले जाते. ‘जेएनयू’मध्ये भाजप चालणार नाही, अशी उपरोधिक टीका करत डॉ. शांतीश्री पंडित पुढे म्हणाल्या, दाेनशे वर्षांपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेले खोटे कथन आपण अजूनही दूर करू शकलो नाही. जर आपल्याला आपला इतिहास माहिती नसेल तर आपण खरा इतिहास येणाऱ्या पिढीला कसा देणार असा प्रश्न त्यांनी केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात प्रसिद्ध इतिहासकार आर. सी. मुजूमदार यांना बाजूला करण्यात आले. त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेवर मोठा अभ्यास केला होता. अनेक तथ्य सांगितली होती. ब्रिटिश काळातील मानसिकतेतून आपल्याला दूर व्हावे लागेल. शाळेपासून जे शिकवण्यात आले ते दूर करावे लागेल, त्यात सुधारणा करावी लागेल, असे आवाहनही डॉ. शांतीश्री पंडित यांनी केले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात जे भारतीय ज्ञान परंपरेचे तज्ञ होते त्यांना दूर करण्यात आले. तर पाश्चात ज्ञानाचा स्वीकार करणाऱ्यांना बळ देण्यात आले. जे सत्याच्या आधारावर नाही असे चुकीचे ज्ञान समाजात पेरण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.