नागपूर : इंडिगो विमानात पुण्याहून नागपूरला येणाऱ्या एका महिलेच्या आसनाला कुशन नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. या प्रवासी महिलेचे नाव सागरिका असल्याचे समजते. गेल्या रविवारी पुण्याहून नागपूरला येणाऱ्या इंडिगो विमानाने प्रवास करण्यासाठी तिकीट बूक केले होते.

सागरिकाला एअरलाइन्सकडून खिडकीच्या बाजूची सीट नंबर १० ए देण्यात आली होती. तेथे पोहोचताच सीटला कुशन नसल्याचे पाहून महिलेला आश्चर्य वाटले. याबाबत महिलेने कर्मचारीकडे तक्रार केली असता त्यांनी उलट महिलेलाच आसनाच्या आजूबाजूला कुशनचा शोध घेण्यास सांगितले. महिलेने शोधाशोध केल्यानंतरही कुशन मिळाले नाही. यानंतर एकदा पुन्हा कर्मचारीकडे विचारणा करण्यात आली, परंतु काहीही झाले नाही. या संपूर्ण प्रकरणावर महिला प्रवासी सागरिका यांचे पती सुब्रत यांनी एअरलाइन्सवर संताप व्यक्त केला. इंडिगोसारख्या एअरलाइन्स कंपनीकडून अशी अपेक्षा नव्हती. विमान रवाना होण्यापूर्वी बोर्डिंगच्या आधी पूर्णत: तपासणीसाठी एक स्वच्छता पथक येत असते, परंतु त्यांचे कुशनवर लक्ष गेले नाही. याचे आश्चर्य वाटते.

हेही वाचा – नागपूर : बेलतरोडीतील सदनिकेत सेक्स रॅकेट, अकरावीच्या विद्यार्थिनीकडून देहव्यापार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

हेही वाचा – बी. टी. देशमुख यांच्या नावे विदर्भातील पहिले सभागृह, कार्याची दखल

दरम्यान, इंडिगोने समाज माध्यमावर सांगितले की, ‘नमस्कार, हे निश्चितच योग्य नाही. कधी-कधी, सीट कुशन आपल्या वेल्क्रोपासून वेगळे होत असते. याला आमच्या चालक दलाच्या मदतीने पुन्हा लावले जाते. तुमची प्रतिक्रिया संबंधित टीमच्या लक्षात आणून दिली जाईल.