गोंदिया : आता १ डिसेंबरपासून गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. इंडिगो कंपनी बिरसी विमानतळावरून सेवा देणार आहे. पहिल्याच दिवसापासून तिरुपती हैदराबाद येथून विमान बिरसी विमानतळावर पोहोचणार असून बिरसी येथून तेच विमान हैदराबाद आणि तिरुपतीला जाणार असल्याने गोंदियासह संपूर्ण मध्यवर्ती भागात प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिरसी विमानतळावर पूर्वीचे फ्लायबिग कंपनीचा काउंटरदेखील अस्तित्वात आहे आणि फ्लायबिगच्या शेजारीच इंडिगो काउंटरदेखील आहे. इंडिगोला त्यांच्या पसंतीचे स्थान देण्यात आले असून, इंडिगो सारख्या कंपनीने देश-विदेशातील हवाई प्रवाशांमध्ये हवाई सेवेवर मोठा विश्वास निर्माण केला आहे, त्यामुळे इंडिगोच्या विमानसेवेचा लाभ गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून मिळत आहे. प्रवासाच्या सुखद अनुभूतीबाबत प्रवाशांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. लोक तिकीट बुक करत आहेत आणि समाज माध्यमावर शेअर करत आहेत आणि आपला आनंदही व्यक्त करत आहेत.
बिरसी विमानतळाचे संचालक शफिक शाह म्हणाले की, पूर्वी असलेली बिरसी विमानतळावर दृश्यमानतेची तांत्रिक समस्या बर्‍याच अंशी दूर झाली आहे.

हेही वाचा – अमरावतीतील ४६ हजार २३५ विद्यार्थ्‍यांची शासन दरबारी नोंदच नाही

लवकरच फ्लायबिगचे पूर्वी चालवलेले काउंटर काढले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. भविष्यात येथून अधिक कंपन्यांना त्यांची सेवा देण्यासाठी विमानतळ प्रशासन पूर्ण सहकार्य करेल. सध्या विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य पोलिसांकडे आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर येथील सुरक्षा आणखी वाढवली जाईल.

हेही वाचा – नागपूर : सावधान ! ‘ग्रीन क्रॅकर्स’च्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

बिरसी विमानतळावर फ्लायबिगचे स्थानही सुरक्षित असल्याचे दिसते. फ्लायबिगचे वरिष्ठ अधिकारी रतन सिंग यांनी सांगितले की, ते आतापर्यंत गोंदिया विमानतळावर बसवण्यात आलेल्या त्यांच्या काउंटरवर पैसे भरत आहेत. गोदिया येथून विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत ते म्हणाले की, त्यावेळी विमानतळ प्रशासनाच्या असहकारामुळे त्यांची कंपनी आता येथे येऊ इच्छित नाही. फ्लायबिगच्या विमानाला टेक ऑफ आणि लँडिंगमध्ये खूप अडचणी आल्या. येथे टर्मिनल बिल्डिंगपासून दूरवर विमान उभे होते, त्यासाठी कंपनीने टर्मिनल बिल्डिंगला पास मिळण्यासाठी वारंवार विनंती केली होती, मात्र त्यावेळी विमानतळ प्रशासनाने सहकार्य केले नाही. याआधी विमानतळावर कार्यरत असलेल्या संचालकाची बदली झाली असून, आता संचालक शफिक शाह बिरसी हे विमानतळ सक्षमपणे चालवताना दिसत आहेत आणि गोंदियाहून दररोज अनेक उड्डाणे चालवण्यासही उत्सुक आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indigo flight ticket booking from gondia birsi airport begins sar 75 ssb