चंद्रशेखर बोबडे

नागपूर: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने चिंचवडच्या पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देऊन ही जागा भाजपला जिंकण्यासाठी एक प्रकारे मदतच केली. थेट लढतीमुळे कसब्यात काँग्रेसने विजय मिळवला. तिरंगी लढतीमुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. या तिरंगी लढतीतील तिसरा उमेदवार हा सेनेचा बंडखोर होता आणि त्याला वंचित बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा होता. येथे मतविभाजनामुळे भाजपचा विजय सुकर झाला. त्यामुळे वंचितच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर

विदर्भात पश्चिम विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही जिल्ह्यात वंचितचा प्रभाव आहे. एकीकडे भाजपविरोधी भूमिका घेतानाच दुसरीकडे जर-तर,अटी शर्तीची भाषा वापरून भाजप आमचा शत्रू नाही, असेही सांगायचे, अशी भूमिका या पक्षाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राहिली आहे. याचा प्रत्यय २०१४, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत व त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही आला. या सर्व निवडणुकीत वंचितमुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा भाजपला व फटका काँग्रेस, राष्ट्रवादीला बसला होता.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नागपूर शिक्षक मतदारसंघातही वंचितने घेतलेली भूमिका अनाकलनीय होती. वंचितची शिवसेनेशी युती असताना व शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला असतानाही येथे वंचितने स्वंतत्र उमेदवार दिला होता. त्यानंतरही ही जागा काँग्रेसने जिंकली. कारण वंचितचा उमेदवार अपेक्षित मत विभाजन करू शकला नाही.

पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचा विजय हा तेथील संघटनात्मक पाठबळ, कार्यकर्ते तसेच दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी केलेली विकास कामे आणि मोदी, फडणवीस व बावनकुळे यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. मतविभाजनामुळे यश मिळाले अशी टीका करणे म्हणजे लोकांनी दिलेला कौल अमान्य करणे होय. 

-चंदन गोस्वामी, प्रवक्ते, भाजप