नागपूर : लोकसभेत काही मतदार संघात आम्हाला अपयश आले असले तरी विधानसभेत मात्र महायुतीचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री महायुतीचा होईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री असताना घरात बसून सरकार चालविणाऱ्यांना राज्याच्या विकासाचे आणि सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचे काही देणे घेणे नाही, अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक वेळा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरेनी शेतीची पाहणी केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार सभामधून खोटा प्रचार केला. त्यामुळे त्यांना जास्त मते मिळाली आहे. मात्र वारंवार तसे होणार नाही. किती दिवस लोकांना खोटी माहिती देणार आहे. लोकसभेत काही मतदार संघात आम्हाला अपयश आले असले तरी विधानसभेत मात्र महायुतीचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री महायुतीचा होईल असेही सामंत म्हणाले.

हेही वाचा…अमरावती : धक्‍कादायक… अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार; तोंडात, डोळ्यात टाकली वाळू

राज्य सरकारने लाडली बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील महिलांनी त्याचे स्वागत केले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे मात्र विरोधकांकडून कुठल्या एखाद्या चांगल्या गोष्टीची चेष्टा केली जाते. हे योग्य नाही. या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील बहिणींना होत आहे. मात्र काही विरोधकांच्या पोटात या योजनेमुळे पोटशूळ आल्याची टीका उदंय सामंत यांनी केली. राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात अनेक चांगल्या योजना आल्या आहेत आणि विरोधकांना त्या बघवत नाही त्यामुळे विरोध केला जात आहे.

माझ्या मतदारसंघात आमदार निलेश राणे यांनी आंदोलन केले होते .मी त्यावर लक्ष ठेवून होतो. त्या व्यक्तीकडून जर खरोखरच गुन्हा घडला असेल. तो कुठलाही जातीचा असो त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका घेतलेली आहे. राज्याचे गृहमंत्री यांनीही पोलीस महासंचालकाला तसे आदेश दिले आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, कडक कारवाई होईल. अवैध तस्करी होत असेल आणि ते सापडले तर त्यावर देखील कठोर कारवाई होईल, असेही सामंत म्हणाले.

हेही वाचा…“नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, ती अक्कल महायुती सरकारमध्ये…,” नाना पटोलेंची टीका

कोकणात राणे आणि सामंत एकत्रितरित्या काम करत आहेत. आमच्यात कुठलेच मतभेद नाही. यामुळे मला वाटत नाही त्यात मनोमिलनाची गरज आहे. आम्ही महायुतीत आहोत आणि राहणार आहे. आमच्या दोन कुटुंबात कुठलाही वाद नाही. कोकणाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत त्यामुळे अन्य लोकांनी त्याची चिंता करण्याची गरज नाही. विधानसभा निवडणुकीत कोकणात आम्ही सर्व जागा जिंकणार असल्याचे सामंत म्हणाले, नागपूरमध्ये एकाच ठिकाणी नाही अनेक ठिकाणी एमआयडीसी होत आहे. भंडारा येथे क्लस्टर तयार होत आहे. नक्षलवादी जिल्हा असलेल्या गडचिरोली आता एक लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे. गडचिरोली नक्षलवादी जिल्ह्याची ओळख पासून उद्योग नगरी अशी ओळख तयार होईल असेही सामंत म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industries minister uday samant predicts mahayuti victory in legislative assembly criticizes uddhav thackeray and opposition vmb 67 psg
Show comments