नागपूर: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील युवकांना वैमानिक प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण योजना सुरू केली. देशभरातून या योजनेचे कौतुकही झाले. परंतु, महाज्योती, राज्य सरकार आणि नागपूर फ्लाईंग क्लबच्या कुचकामी धोरणामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे करिअर दावणीला लागले आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२४च्या पहिल्या आठवड्यात प्रशिक्षणार्थींच्या आमरण उपोषणाची दखल घेत दुसऱ्या संस्थेशी करार करून प्रशिक्षण देण्याच्या आश्वासनाचाही सरकारला विसर पडला आहे. व्यवसायिक वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्याला २०० तास विमान उडविण्याचा अनुभव असेल तरच त्यांना कमर्शियल पायलट लायसेन्स (सीपीएल) दिले जाते. याच परवानाच्या आधारे तो नोकरीस पात्र ठरतो. यासाठी महाज्योती आणि नागपूर फ्लाईंग क्लब यांच्यात करार झाला. यासाठी ‘महाज्योती’ने नागपूर फ्लाईंग क्लबला साडेसात कोटी रुपये दिले. या प्रशिक्षणासाठी राज्यातील २० विद्यार्थ्यांची निवड झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा