नागपूर: उराजधानीतील अनेक भागात नागनदी अथवा इतर घाण पाणी शिरल्यामुळे डायरिया, डिसेंट्री, कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ आणि लेप्टोस्पायरोसिससह डेंग्यूसारख्या संसर्गजन्य आजारांची जोखीम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेचे आरोग्य विभाग या आजारांवर नियंत्रणासाठी फिव्हर सर्वेक्षण आणि स्प्रे-फॉगिंगपासून तर क्लोरिन सोल्यूशन, क्लोरिन गोळ्यांचे वाटपाचा दावा करत असले तरी योग्य काळजी न घेतल्यास संसर्गजन्य आजार वाढू शकतात.

हेही वाचा… कोणतीही परिक्षा नाही, थेट निवड! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांची भरती, आजच अर्ज करा..

महापालिका हद्दीत ५१ नागरी आरोग्य केंद्र आहेत. येथील सर्व डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविकांसह आशा वर्कर, मलेरिया विभागातील फवारणी करणारे कर्मचारी असे तीनशेवर मनुष्यबळाच्या माध्यमातून प्रभावित परिसरात फॉगिंग सुरू आहे. शंकरनगर, डागा लेआऊट, समता लेआऊट तसेच इतरही भागात फिव्हर सर्वेक्षण करण्यात आले. यात सुमारे पन्नासपेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले. तर आशा आणि आरोग्य सेविकांच्या माध्यमातून प्रत्येक घरी क्लोरिन सोल्यूशन तसेच क्लोरिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा… पोलीस दादा, गणवेशात नको ना नाचू; पोलीस महासंचालकांचे काय आहेत आदेश? वाचा…

दरम्यान, ज्या ठिकाणी अद्याप पाणी साचले आहेत अशा ठिकाणी औषध फवारणी केली आहे. स्वच्छता विभागाद्वारे विविध भागातील रस्ते स्वच्छ केले जात आहेत. अंबाझरी लेआउट डागा लेआउट या रोडवर साचलेला गाळ काढण्यात आले. परंतु आताही काही भागात चिखल आणि दुर्गंधी असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. तर आजही काही खुले भूखंड आणि घरातील खोलगट भागात पाणी तुंबले आहे. त्यामुळे किटकजन्य आणि संसर्गजन्य आजाराचा धोका वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहे. तर महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार म्हणाले, डेंग्यू – मलेरिया प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा… चंद्रपूर : अरबिंदो रियल्टी कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. डेंग्यूसह इतरही संसर्ग आजाराची लक्षणे असल्यास नागरिकांनी ०७१२२५६७०२१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infectious diseases are increasing in nagpur mnb 82 dvr