नागपूर : उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’चे दोन नवीन मृत्यू नोंदवण्यात आले असून प्रथमच इनफ्लुएन्झा ‘एएच ३ एन २’ आणि इनफ्लुएन्झा ‘ए’ या दोन वेगवेगळ्या इनफ्लूएन्झा उपप्रकाराचे मृत्यूही नोंदवले गेले आहेत.

सध्या घराघरात सर्दी, खाेकला, ताप, अशा ‘स्वाईन फ्लू’ सदृश लक्षणाचे रुग्ण आहेत. त्यातच स्वाईन फ्लूग्रस्तांची संख्याही वाढली आहे. इनफ्लुएन्झाचे निदान झालेल्या व उपचारादरम्यान दगावलेल्या चार रुग्णांचे प्रकरण शुक्रवारच्या बैठकीत मृत्यू विश्लेषण समितीसमोर मांडण्यात आले. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, चारपैकी दोघांचा मृत्यू इनफ्लुएन्झा एएच १ एन १ या स्वाईन फ्लूने झाला आहे. तिसऱ्याचा मृत्यू हा इनफ्लुएन्झा ‘एएच १ एन १’ आणि चौथ्याचा मृत्यू हा इनफ्लुएन्झा ‘ए’ मुळे झाल्याचे पुढे आले.

pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
Loksatta explained What is the exact reason behind the death of ten elephants in Bandhavgarh National Park in Madhya Pradesh
विश्लेषण: एकाच वेळी दहा हत्तींच्या मृत्यूमागे नेमके कारण काय?
sucide pod controversy
सुसाईड पॉडमध्ये महिलेचा रहस्यमयी मृत्यू? मृत्यूचे कारण आत्महत्या की हत्या? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?
death of a boy, Pimpri, case registered doctors,
पिंपरी : चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरसह दोन परिचारिकांवर गुन्हा
child dies after candy sticks to his throat
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! गोळी घशात अडकून चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; तीन तास कुटुंबियांनी केला संघर्ष, डॉक्टरही झाले हतबल

हेही वाचा – गडचिरोली : महागाव हत्याकांड : संघामित्राच्या बालमित्राने पुरविले ‘थॅलियम’, मुंबईतून विष खरेदी करण्यासाठी…

नागपूर शहरात प्रथमच इनफ्लुएन्झाच्या एएच १ एन १ आणि ए संवर्गातील मृत्यू नोंदवल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेकडून या रुग्णाच्या संपर्कातील माहिती घेतली जात असून या भागात जनजागृतीसह इतर उपक्रम हाती घेतल्याचा दावा केला जात आहे. नवीन रुग्णांमुळे नागपूर शहरात आजपर्यंत आढळलेल्या स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या आता ६१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४५ बरे होऊन घरीही गेले तर आठ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. नवीन मृत्यूंमुळे नागपूर शहरात आजपर्यंत स्वाईन फ्लूने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ८ आणि एएच ३ एन २ मृत्यूंची संख्या १ तर जिल्ह्याबाहेरील स्वाईन फ्लू मृत्यूंची संख्या ४ आणि इनफ्लुएन्झा ‘ए’मुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या १ नोंदवली गेली आहे. या बैठकीत महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. प्रमोद गवई, डॉ. गुंजन दलाल, डॉ. विनोद बिटपल्लीवार उपस्थित होते.

हेही वाचा – देशात दहा महिन्यांत १५० हून अधिक वाघांचा मृत्यू; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण

काळजी घ्या, आजार टाळा

“नागपुरातील इनफ्लुएन्झाने दगावलेल्या बहुतांश रुग्णांना सहव्याधी होती, असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे सहआजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गर्दीत जाणे टाळावे, स्वाईन फ्लूचे एकही लक्षण असल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी.” – डॉ. गोवर्धन नवखरे, साथरोग अधिकारी, महापालिका.