वर्धा : पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यावर काय अंमल झाला, हे विचारण्याची फार थोड्यांची बिशाद असते. बरेचदा त्याचे कधीच उत्तर मिळत नसल्याचेही अनुभव घेणारे आहेत. पण सदरक्षणायचे ब्रीद सांगणाऱ्या पोलीस दलात चांगले काम पण होवू शकते,असा विश्वास देणारा उपक्रम वर्धा पोलिसांनी अंमलात आणला आहे.

सेवा म्हणजेच सर्व्हिस एक्सेलांस अँड विक्टिम असिस्टंस हा पथदर्शी उपक्रम सुरू केला. रुजू झाल्यानंतर वर्धा पोलीस खात्यात वेगवेगळे उपक्रम तसेच जनताभिमुख सेवेवर कटाक्ष ठेवणारे म्हणून परिचित झालेले पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचे हे ‘ब्रेनचाईल्ड’ आहे.

हेही वाचा – शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्त्वाचे : महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेने पाठवली काळजी व्यक्त करणारी सूचनावली

पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार प्राप्त झाल्यावर त्या तक्रारीची नोंद सेवा प्रणालीत होणार. ही नोंद तक्रारकर्त्यास पण कळणार. तक्रार संबंधित पोलीस ठाण्यास पाठविली जाईल. या तक्रारीवर झालेल्या कारवाईच्या माहितीचा संदेश वेळोवेळी तक्रारकरत्यास मिळेल. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती जाणार.

हेही वाचा – खगोलप्रेमींसाठी पर्वणी! नभांगणात आजपासून महाकाय आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे दर्शन

ही प्रणाली तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास नूरुल हसन यांनी व्यक्त केला. या सेवेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे सचिव श्रीकर परदेशी, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर व विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले.

Story img Loader