नागपूर : मागील चार वर्षांत धावत्या एसटी बसमध्ये बिघाडाचे प्रमाण वाढले आहे. यंदा राज्यात रोज १८३ बसेस बंद पडल्याची धक्कादायक माहिती आहे. एवढ्या संख्येने धावत्या बसमध्ये बिघाड होत असल्याने एसटीच्या प्रवासी वाहतुकीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान अचानक प्रवासादरम्यान बसमध्ये बिघाड झालयाने प्रवाश्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे.

एसटी महामंडळात २०१८-१९ मध्ये १६ हजार ४१४ बसेस रस्त्यावर धावत होत्या. २०१९-२० मध्ये ही संख्या १५ हजार ७६४, २०२०-२१ मध्ये ७ हजार ९६०, २०२१-२२ मध्ये ६ हजार ६८८, २०२२-२३ मध्ये १३ हजार ३१६ तर २०२३-२४ मध्ये १४ हजार ६१ बसेसपर्यंत खाली आली. दरम्यान, १ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ या काळात रस्त्यावर धावणाऱ्या एकूण बसेसपैकी १ हजार ८७६ (रोज सुमारे २० बसेस मध्ये बिघाड) वेळा बिघाड झाला.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
pm narendra modi on dr manmohan singh death
Dr. Manmohan Singh Death: “मी मुख्यमंत्री असताना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या मनमोहन सिंग यांच्या आठवणी; म्हणाले, “दिल्लीत आल्यानंतर माझं…”
second iron girder of Gopal Krishna Gokhale flyover has been bring down successfully
गोखलेपुलाची तुळई खाली आणण्याचे काम अखेर पूर्ण, कामाला उशीर झाल्यामुळे कंत्राटदाराला दंड होणार
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
Malabar Hill Constituency, Marathi candidate in Malabar Hill, Malabar Hill latest news,
मलबार हिल मतदारसंघात ‘अमराठी’ला मराठीचे आव्हान
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
devendra fadnavis and dawood
Nawab Malik : नवाब मलिकांचा भाजपा नेत्यांना इशारा; म्हणाले, “दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांविरोधात…”

हेही वाचा >>>‘एमपीएससी’: ‘या’ उमेदवारांना सुवर्ण संधी; तेवीस परीक्षा…

बिघाड होणाऱ्या बसेसमध्ये कधी एकदा वा कधी त्याहून जास्त वेळा बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान एकूण बसेसमध्ये ६४ हजार ३३५ वेळा (रोज १७६ बसेस) बिघाड झाला. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान एकूण बसेसमध्ये ६७ हजार १९ वेळा (रोज १८३ बसेस) बिघाड झाला. १ एप्रिल २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान एकूण बसेसमध्ये ३९ हजार २२७ (रोज १८३ बसेस) वेळा बिघाड झाल्याचेही माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

हेही वाचा >>>अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…

एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनीही दिली कबूली

एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपुरात संचालक मंडळाची बैठक घेतली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत करोनानंतर एसटी महामंडळात बसेसची संख्या कमी होऊन जुन्या बसेसची संख्या वाढल्याचे कबूल केले होते. त्यामुळे एकीकडे एसटी बसमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढून अपघातही वाढल्याची कबूली दिली होती. त्यामुळे एसटी महामंडळ आता मोठ्या प्रमाणावर नवीन बसेसची खरेदी करणार असल्याचेही गोगावले यांनी सांगितले होते.

प्रवासी व उत्पन्न

……………………………………………………………………………………….

वर्ष                         प्रवासी (लाखात)           उत्पन्न (लाखात)

………………………………………………………………………………………..

१-१-२२ ते ३१-३-२२        ७८७.५२                   ४५,९९९.७६

१-४-२२ ते ३१-३-२३        १५,९७९.९२              ७,४१,०२८.७८

१-४-२३ ते ३१-३-२४        २०,३०८.४७              ९,९७,८४७.४७

१-४-२४ ते ३१-१०-२४      १२,०९३.१०              ५,९१,९९३.०९

Story img Loader