नागपूर: हलबा, माना, गोवारी, धनगर, धोबा, ठाकूर या आदिवासी समाजाला संविधानिक न्यायापासून सरकारने वंचित ठेवले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौक, नागपूर येथे आज सायंकाळी ५.३० वाजता आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा कृती समितीने केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – धक्कादायक.. नागपुरात व्यसनी मुलाकडून आईची हत्या, रुमालाने गळा आवळला

हेही वाचा – शासकीय रुग्णालयांतील रुग्णांची माहिती आता ‘एका क्लिक’वर! राष्ट्रीय माहिती केंद्राकडे सोपवले काम

याबाबत ॲड. नंदा पराते म्हणाल्या, शासनाने ४५ जमातींपैकी हलबा, माना, गोवारी, धनगर, धोबा व ठाकूर या आदिवासी जमातींसह ३३ जमाती क्षेत्रबंधनाबाहेरील असल्याने त्यांना संविधानिक न्यायापासून वंचित केले. त्यामुळे हलबा समाजमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे भाजप सरकार विरोधात आंदोलनातून रस्त्यावर आक्रोश केला जाईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injustice to the halba community agitation of national primitive action committee in nagpur today mnb 82 ssb