नागपूर : पुणे येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर घडलेल्या शाई फेक प्रकरणानंतर विधान भवन परिसरातील सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर शाई पेन आले आहेत. विधिमंडळातही शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. आज पहिल्या दिवशी विधिमंळात येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. शाईचे पेन नेण्यास बंदी घालण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे येथे समता सैनिक दलाच्या सैनिकांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक केली. या प्रकरणी दोन लोकांसह एक पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एका ठिकणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही कार्यक्रमात पत्रकारांचे पेन तपासण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद दिसून आले. आज पहिल्या दिवशी येथे येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. त्यामुळे सरकारने शाई प्रकरणाचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: शाईफेकीच्या धमकीनंतर Chandrakant Patil फेसमास्क लावून कार्यक्रमाला; कडक बंदोबस्तानंतरही खबरदारी

केसरकर म्हणतात, खबरदारीचा उपाय!

याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याकडून काळजी घेतली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ink pens banned in nagpur vidhan bhavan after the ink fake case against chandrakant patil mnb 82 tmb 01