यवतमाळ : येथील जिल्हा  कारागुहात प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून रोखल्याने आठ कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर हल्ला करुन बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी सकाळी येथील कारागृहात घडली. घटनेनंतर रात्री उशिरा या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा कारागृहात कर्तव्यावर असलेल्या  शिपायाने न्यायाधीन बंद्याला प्रतिबंधित  क्षेत्रात जाण्यापासून रोखले. त्यामुळे चिडलेल्या कैद्याने कर्मचाऱ्यावर थेट  हल्ला चढविला. हा प्रकार लक्षात  येताच तुरूंग अधिकारी (श्रेणी-२) हे  तेथे पोहोचले. मात्र, न्यायाधीन  बंद्याचे इतर सात साथीदार धावून आले आणि त्यानीही अधिकारी,  कर्मचाऱ्याला मारहाण केली.

हेही वाचा >>> अवकाळी पावसाचा तडाखा, नागपूरची बत्ती गुल; महावितरण म्हणते…

तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून न्यायाधीन बंदी ओंकार गजानन  कुंडले (२२), जुनेद फारुख शेख  (३५), सतपाल महादेव रूपनवार (३५), नयनेश उर्फ नयन बाबूराव निकम (३९), आकाश उर्फ गुडू  प्रकाश भालेराव (३०), सोहेल महेबूब बादशाह शेख (४०), मनोज शंकर शिरशीकर (२८), नामदेव प्रकाश नाईक (२५) या आठ बंद्याविरुद्ध  अवधूतवाडी पोलिसात शासकीय  कामात अडथळा निर्माण करणे,  कारागृहातील नियमांचा भंग करणे  यासह संगनमताने हल्ला करणे असे विविध गुन्हे दा करण्यात आले. 

हेही वाचा >>> भर दिवसा नागपूर काळवंडले; सोसाट्याचा वारा, मुसळधार पावसाने शहराला झोडपले

कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

कारागृहात कर्तव्यावर असलेले कर्मचारी सूरज देवीदास मसराम यांनी न्यायाधीन बंदी ओंकार कुंडले हा  प्रतिबंधित क्षेत्रात जात असताना त्याला अडविले.   यावरून ओंकारने सूरजसोबत हुज्जत  घातली. नंतर सूरजजवळची काठी हिसकावून त्यालाच मारहाण सुरू केली. हा प्रकार तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे यांच्या निदर्शनास आला तेव्हा त्यांनी ओंकारला अडविले. त्यावेळी ओंकारचे सात साथीदार एकत्र आले आणि त्यांनी धनाजी हुलगुंडे, सूरज मसराम या  दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण  केली, असे तक्रारीत नमूद केले आहे. सकाळी घटना घडूनही तक्रार रात्री उशिरा दाखल केल्याने विविध चर्चा असून, कारागृहात तुरुंग अधिकारी, कर्मचारीच सुरक्षित नसल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inmate in yavatmal district jail attack prison officer and constable nrp 78 zws
Show comments