नागपूर: नागपूर जिल्ह्यातील १६ हजारावर ग्राहकांनी घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून रूफटाॅफ सोलर योजना घेतली आहे. त्यामु‌ळे या ग्राहकांचे वीज देयक निम्याहून कमी तर काही ग्राहकांचे नाममात्र १२० रुपयांवर आले आहे.

महावितरणच्या रूफटॉप सोलर योजनेचा नागपूर जिल्ह्यातील १६ हजार १९२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. योजना घेतल्याने या ग्राहकांची वीज निर्मिती क्षमता १७२ मेगावॅट आहे. या ग्राहकांना केंद्र सरकारकडून प्रकल्प क्षमतेनुसार २० ते ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. ग्राहक सौर ऊर्जा वापरत असल्याने त्याच्या देयकात मोठी कपात होते. योजनेच्या प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यास ती महावितरणला दिली जाते.

हेही वाचा >>>यवतमाळ: भर पावसात अर्धनग्न आंदोलन; मारेगावात घरात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त

ग्राहकाकडे कमी वीज निर्माण झाल्यास अतिरिक्त वीज महावितरणकडून ग्राहकांला मिळते. या वीजेची नेट मिटरिंगद्वारे नोंद ठेवली जाते. महिन्याच्या शेवटी वीज देयकात ग्राहकाने तयार केलेली वीज व महावितरणकडून घेतलेल्या वीजेची वजाबाकी करून देयक दिले जाते. या योजनेमुळे काही ग्राहकांचे देयक १२० रुपये तर काहींचे निम्याहून कमी झाले आहे. या योजनेची माहिती महावितरणच्या डब्लूडब्लूडब्लू.महाडिस्काॅम.इन/इजस्मार्ट या संकेतस्थळावर आहे. ग्राहकांना येथे ऑनलाईन अर्जही भरता येतो. महावितरणकडे नोंदणीकृत एजन्सीमार्फत ग्राहकांकडे प्रकल्प बसवले जाते. हा प्रकल्प लावल्यावर त्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो. पण वीज निर्मिती प्रकल्पाचा उपयोग पंचवीस वर्षे होत असल्याचे महावितरणचे म्हनने आहे.

Story img Loader