देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम आहेत. परंतु कारंजा तालुक्यातील मसला खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहन करताना ध्वज सहितेचा भंग झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या शिक्षकावर कारवाईची मागणी होत आहे.
हेही वाचा >>>धक्कादायक! न्यायासाठी प्रजासत्ताक दिनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
पंचायत समिती कारंजा अंतर्गत येत असलेल्या मसला खुर्द जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक राष्ट्रध्वजाची गाठच सुटत नसल्याने राष्ट्रध्वज तीनदा खाली उतरून आणि अर्ध्यावर फडकवत असल्याचा व्हिडिओ प्रसारीत झाल्याने संताप व्यक्त होत आहे. विषेश म्हणजे सदर शिक्षक याआधीही बर्याच प्रकरणामध्ये वादग्रस्त असुन त्याचे धोंडी प्रकरण चांगलेच गाजलेले होते. याप्रकरणी कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पडघान यांना विचारना केली असता सदर प्रकरणी शिक्षणाधिकारी यांना चौकशी साठी सूचित करण्यात आले असून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.