लोकसत्ता टीम

अकोला : दिवाळी तोंडावर असताना अद्यापही पीक विमा नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळाली नाही. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. दरम्यान. संतप्त शिवसैनिकांनी गुरुवारी दुपारी कौलखेड मार्गावरील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली.

meerut building collapse update
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा तीन मजली इमारत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, आठवड्याभरातली दुसरी घटना
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Forfeiture action by Vasai virar Municipal corporation against property owners who keep arrears of property tax
मालमत्ता थकबाकीदारांना पालिकेचा दणका; पालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरवात
dcm ajit pawar warning pimpri chinchwad police over liquor sale prostitution in alandi
आळंदीतील मद्यविक्री, वेश्याव्यवसाय बंद न झाल्यास पोलिसांवर कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
Ajit Pawar, finance company, pune,
Ajit Pawar : “हे तर पठाणी व्याज झालं”, फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याला अजित पवारांनी सुनावलं
Police beaten, encroachment, Pimpri,
पिंपरी : पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण काढताना पोलिसांनाच मारहाण
Why change in sugar control order is needed after 58 years
साखर नियंत्रण आदेशात ५८ वर्षांनी बदलाची गरज का? नवीन तरतुदी काय आहेत?
Mumbai High Court, idol immersion, Aarey lakes, Ganesha idols, environmental protection, CPCB guidelines, Mumbai, Van Shakti, public interest litigation
आरेतील तीन तलावांत मूर्ती विसर्जनास बंदी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची न्यायालयात भूमिका

आणखी वाचा-नागपूर : कुणबी नोंदीबाबतचा संभ्रम दूर करा, काय म्हणाले तायवाडे?

यंदा नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन कापसाचा उतारा घटला आहे. इतरही पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पिके वाहून गेली आणि जमीनही खरडून गेली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. सोयाबीन, कपाशी आदी मुख्य पिकांचे सरासरी उत्पादन कमी झाले. बाजारातील भाव सुद्धा पडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला.

पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी उपोषण सुरू केले. सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना शासन, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे कार्यालय फोडण्याचा इशारा (उबाठा) शिवसेनेने दिला होता. पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अद्याप दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी गुरुवारी पीक विमा कंपनीच्या अकोला जिल्हा कार्यालयात तोडफोड केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.