अकोला : कर्णबधिरांच्या शिक्षणासाठी संवादात्मक शिक्षण अ‍ॅप निर्मिती अकोल्यातील ‘लर्न अँड एम्पॉवर’ संस्थेनी केली आहे. कर्णबधिरांना सुलभपणे शिकण्यासाठी याचा लाभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय मूकबधिर सप्ताहानिमित्त ‘लर्न अँड एम्पॉवर’ या स्टार्टअपच्या संस्थापकांचा सत्कार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. जिल्ह्यातील युवकांमध्ये चांगली उद्यमशीलता व संशोधन क्षमता असून, योग्य संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू शकतात, असे जिल्हाधिकारी अजित कुंभार म्हणाले.

हेही वाचा – भक्तांच्या श्रद्धेला पावणारा मानाचा गणपती! श्री बाराभाई गणपतीचा १३३ हून अधिक वर्षांचा इतिहास

उपक्रमाचे सहसंस्थापक व सीओओ प्रबोध महाजन, शुभंकर पोतदार, प्र. समाजकल्याण अधिकारी शरद पुंड, शासकीय मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका मोदक आदी उपस्थित होते.

हेही वाचा – अनधिकृत विजेवर गणेशोत्सवाचा झगमगाट, अकोल्यात १७३२ पैकी केवळ ४६ मंडळांकडे अधिकृत वीज; …तर मोठ्या अपघाताचा धोका

संस्थेतर्फे कर्णबधिर बांधवांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी संवादात्मक शिक्षण अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा २०२२ मध्ये संस्थेला राज्यस्तरीय पारितोषिकही मिळाले आहे. या स्टार्टअपद्वारे ‘रेझोनेट लर्निंग’ व ‘साईनअसिस्टिव्ह प्लॅटफॉर्म’चे सादरीकरण करण्यात आले. ही दोन्ही ॲप्लिकेशन्स मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणात सहाय्यकारी ठरू शकतील, असे संस्थेच्या प्रतिनिधींनी सादरीकरणात सांगितले.