वर्धा : आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी पक्षीगणना होते. ती ग्रेट बँकयार्ड बर्ड काउन्ट म्हणून ओळखल्या जात असते. त्याचे औचित्य साधून पक्षी निरीक्षकांनी मोहीम राबविली होती. देशातील ३७ राज्यांनी त्यात भाग घेतला. ३८९ पक्षी प्रजातीसह महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आला. तर राज्यात वर्धा जिल्हा १३ व्या स्थानावर आहे.

चार दिवसात चाळीस पक्षी दिसून आले. जिल्ह्यात एकूण १४६ पक्ष्याची नोंद झालेली आहे. पक्षी अभ्यासक राहुल वकारे व पवन दरणे यांना बोर धरण परिसरात लीफ बर्बलर हा पक्षी प्रथमच दिसला. त्यामुळे पक्षी वैभवात भर पडल्याचे ते म्हणतात. आययुसीएन या जागतिक संघटनेने केलेल्या वर्गीकरणनुसार असुरक्षित गटातील नदी सुरय, संकट समीप गटातील मोठा करवानक, काळ्या शेपटीचा पाण टिवला, तिरंदाज, काळा शराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा, करण पोपट हे आढळले.

Devendra Fadnavis remark on river linking project in Maharashtra
नदीजोड प्रकल्पातून महाराष्ट्राचा कायापालट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
nana patole and chandrashekhar bawankule performance in maharashtra assembly poll
लोकजागर : संधीचे सोने अन् माती!
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Citizens of 30 thousand villages will get e-property card ownership scheme
३० हजार गावातील नागरिकांना मि‌ळणार ई- प्रापर्टी कार्ड,  बावनकुळे म्हणाले स्वामित्व योजना
thundershower and rain forecast in the state between December 27 28 Nagpur news Rgc 76 amy 95
राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
Statement by Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat on education
चंद्रपूर : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात,‘ बुद्धी नीट चालली, तर नराचा नारायण; अन्यथा…
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

हेही वाचा – नागपूर शहरात पुन्हा वाढला पिस्तुलांचा वापर

हेही वाचा – यवतमाळकरांची लेकूरवाळी ‘शकुंतला’ ब्रॉडगेज होणार!

पक्षीमित्र संघटनेचे दिलीप विरखेडे, डॉ. चेतना उगले, मनीष ठाकरे, सफल पाटील, श्रीकांत वाघ, शंतनू बोरवार, प्रियंका नेहेते, प्रकाश भोयर, विनोद साळवे यांनी नोंदी घेतल्या. संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर तसेच डॉ. गजानन वाघ, किरण मोरे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, माजी वनपाल, अशोक भाणसे, प्रशांत काकडे, अविनाश भोले यांनी मार्गदर्शन केले. पक्षी निरीक्षण रोठा तलाव, बोर प्रकल्प, सारंगपुरी तलाव, दिग्रस व मदन जलाशय, कस्तुरबा रुग्णालय या परिसरात झाले.

Story img Loader