अकोला : आकाशात विविध ग्रह तारकासोबतच मानव निर्मित आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र फिरत्या चांदणीच्या स्वरूपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. आज, १० जानेवारीला सायंकाळी महाराष्ट्रासोबतच मध्य भारतातील विविध भागातून हे केंद्र जात असल्याने त्याचे अधिक प्रकाशमान स्वरूपातील दर्शन निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनी होईल. यावेळी शुक्र, शनी, गुरू जवळ चंद्र आणि मंगळ ग्रह सहज पाहता येईल. या अनोख्या खगोलीय घटनांचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

अवघ्या दीड तासात पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करणारे हे महाकाय आकाराचे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र मुंबई ते नागपूर एवढे अंतर केवळ दीड मिनिटांत पूर्ण करते. बहुपरिचित भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यामध्ये वास्तव्यास असून केवळ सात दिवसांच्या संशोधनासाठी त्या गेल्या. मात्र, ‘स्टार लायनर’ या परतीच्या यानात हेलियम वायू गळतीमुळे गेल्या सात महिन्यांपासून त्याच पृथ्वीवर येण्याच्या प्रतिक्षेत आहेत, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

हे ही वाचा… भंडारा : धक्कादायक! एकाच नंबर प्लेटच्या दोन स्कूल व्हॅन; त्यातही घरगुती सिलेंडर…

हे ही वाचा… नागपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते! अल्पवयीन प्रेयसीचा आयफोनसाठी हट्ट; प्रियकराने…

यावेळी आंतरराष्ट्रीय अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र हे भारताच्या मध्य भागातून जात असल्याने त्याच्या दर्शनाचा लाभ अधिक संख्येने घेता येईल. हे केंद्र पृथ्वीच्या ज्या भागातून जाते, त्या ठिकाणी ते फिरत्या चांदणीच्या स्वरूपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. विविध ठिकाणातील बदलामुळे काहीसा दिशा, वेळ व तेजस्वीतेत फरक होईल. या फिरत्या चांदणीचा आरंभ पश्चिमेस खूप ठळक दिसणाऱ्या शुक्रा जवळून होईल. याच वेळी जवळच्या शनी ग्रहाचे व नंतर आज होणाऱ्या चंद्र व गुरु ग्रहाचे दर्शन घेता येणार आहे. आकाश मध्य भागात हे अंतराळ केंद्र अधिक तेजस्वी जवळ जवळ शुक्रा सारखे असेल. गुरु, चंद्राचे भेटीनंतर हे केंद्र लालसर मंगळाचे उत्तर आकाशात समारोप करताना दिसेल. दर्शन कालावधी सायंकाळी नैॠत्य आकाशात सुरू होऊन उत्तर-पूर्व अर्थात ईशान्य आकाशात संपुष्टात येईल. आकाशातील खुल्या मंडपात दिसणाऱ्या या दोन्ही घटनांचा आनंद आपण शक्य तितक्या अंधाऱ्या व मोकळ्या जागेतून अधिक चांगल्या प्रकारे घेता येणार आहे, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले. अवकाश प्रेमींसाठी ही दुर्मीळ घटना मोठी पर्वणी ठरणार आहे.

Story img Loader