चंद्रपूर: विदर्भ ही वाघांची भूमी आहे; जैवविविधतेने संपन्न असलेल्या या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात; याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाची व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत देखील घेता येईल; यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि परिसरात रोजगार निर्मिती व अर्थकारण मजबूत होण्यास निश्चित मदत होईल यासाठी वन अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे अश्या सूचना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. नागपूर येथे यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख शैलेंद्र  टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, वनविकास महामंडळाचे सिजिएम संजीवकुमार, प्रशांत झुरमुरे, कल्याणकुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी एक सादरीकरण ना. सुधीर मुनगंटीवार यांना दाखविण्यात आले.

Vellore, Reliance projects, Ratnagiri, employment,
रत्नागिरीत येणारे वेल्लोर आणि रिलायन्स प्रकल्प प्रदूषण विरहित; २० हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांना मिळणार रोजगार – उदय सामंत
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
vanrani, Sanjay Gandhi National Park ,
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी लवकरच पर्यटकांच्या सेवेत
Kaas plateau huge tourist crowd
कास पठारावर पर्यटकांची गर्दी; पुन्हा वाहतूक कोंडी
maharashtra first floating solar power project in will be set up in arvi taluka
राज्यातील पहिला तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आर्वीत साकारणार
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
International Microorganism Day Marathwada and Maharashtra need to get rid of harmful chemical farming
आता मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतीसाठी ‘जैविक संग्राम’ हवा!
Onion export decision delayed for three days due to technical reasons
कांदा निर्यातीचा निर्णय तांत्रिक कारणांमुळे तीन दिवसांपासून अधांतरी

हेही वाचा >>>केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा गडचिरोली दौरा पुढे ढकलला; कारण काय? जाणून घ्या…

चंद्रपूर-मूल मार्गावर वनप्रबोधिनी जवळील प्रशस्त वनक्षेत्रात व्याघ्र सफारी प्रकल्प व्हावा असा संकल्प असून केवळ व्याघ्र सफारीपुरता हा मर्यादित न ठेवता इतर वन्यजीवांचाही या सफारीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा;अश्या प्रकल्पातून संशोधन व्हावे अशीदेखील अपेक्षा यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. मुनगंटीवार म्हणाले की, सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवीनतम, अत्याधुनिक दर्जाचे विरंगुळा केंद्र या ठिकाणी व्हावे यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असून तेथे असलेल्या वन्यजीवांची माहीती, त्यावर एखादा माहितीपूर्ण शो पर्यटकांसाठी करता येईल का, याचाही विचार करावा अशा सूचना यावेळी दिल्या.