कृत्रिम बुध्दीमत्ता हा येत्या काळात परवलीचा शब्द ठरणार तर. सावंगी येथील दत्ता मेेघे अभिमत विद्यापिठात ‘शिक्षण व तंत्रज्ञानात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईच्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे वैज्ञानिक अधिकारी डॉ.बी सत्यनारायणा बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ईस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ.सुरेंद्र पाल हे होते.

डॉ.सत्यनारायणा पुढे म्हणाले की आरोग्यसेवा, शिक्षण, तंत्रज्ञान, वाणिज्य, कृषी आदी क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता मोठे परिवर्तन घडवून आणेल. मात्र मानवाकडे अनुभव, सृजनशीलता आणि निर्णय घेण्याची जी प्रासंगिक क्षमता असते त्याचे अनुकरण कृत्रिम बुध्दीमत्ता करू शकत नाही. पश्चिम बंगालमधील रायगंज विद्यापिठाचे डॉ.जे.के.मंडल म्हणाले की शिक्षणप्रणालीत कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर हा विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचाही मानसिकता थकवा दूर सारण्यास सहायक ठरणार आहे. डॉ.सुरेंद्र पाल म्हणाले की पुढील काळात अभियंत्रेत कृत्रिम बुध्दीमत्तेच्या मदतीने डॉक्टरांना त्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये मदत करतील. यावेळी मुंबईच्या सोमय्या विद्याविहारचे अधिष्ठाता डॉ.आर.जी.करंदीकर, यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ.अरविंद भगत, प्रकुलगुरू डॉ.गौरव मिश्रा, अंतर्गत गुणवत्ता कक्षाच्या डॉ.तृप्ती वाघमारे, दंत महाविद्यालयाचे डॉ.राम ठोंबरे, तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.के.टी.व्ही.रेड्डी यांची भाषणे झाली. उत्कृष्ट शोधनिबंधाचा पुरस्कार गाझियाबादच्या ऋचा सिंग, चन्नईच्या डॉ.रिचर्ड हॅडली व नागपूरच्या डॉ.निलेशसिंग ठाकूर यांना प्रदान करण्यात आला. समारंभाची सुरूवात विद्यापिठ गीताने झाली. आगामी आंतरराष्ट्रीय परिषद २७ व २८ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असल्याचे डॉ.रेड्डी यांनी जाहीर केले. डॉ.पी.के.पी.गायत्री चोप्रा यांची संचालन केले व उत्कर्षा पाचारणे यांनी आभार प्रदर्शन केले.डॉक्टर सर्वश्री प्रतीक वर्मा, गौरव श्रीवास्तव, स्वप्नील गुंडेवार, राजेंद्र रेवतकर, चेतन पुरी, अमित गुडधे, पलाश गौरशेट्टीवर, निशा ठाकूर, सुबोध दारुंदे, बेनी सम्युआल, कुलदीप नरांजे, नीरज केंडे यांचे योगदान लाभले.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
Story img Loader