नागपूर : तहसील पोलिसांनी रुग्णालय परिसरातून वाहन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा भंडाफोड केला. चार आरोपींना अटक करून ४० वाहनांसह १३ लाख रुपयांचा माल जप्त केला. आरोपींनी नागपूरच नाहीतर वेगवेगळ्या राज्यांच्या शहरामध्ये रुग्णालय परिसरातून वाहन चोरी केले होते. रोहित गुनाराम चंद्रपुरी , नीरज शिवकुमार नागवंशी, अमित कैलाश अहेके  आणि रोहित बंसीलाल नागले सर्व रा. छिंदवाडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दिनेश उर्फ दीपक कुमार तित्तू कुमरे रा. जुन्नरदेव, छिंदवाडा हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा >>> मॅक्सी कॅबची वाहतूक अधिकृत करण्याचा डाव… एसटी बससह प्रवाशांची सुरक्षा

Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
police Pune, police at night, Pune, police news,
पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
Police dispute escalates opposition to cancellation of transfer of new police officers
पोलिसांमधील वाद विकोपाला, नवीन पोलिसांचा बदली रद्द करण्याला विरोध
Akhilesh Shukla police
कल्याणमधील मारहाणप्रकरणी शुक्ला यांच्यासह दोन जण ताब्यात, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे उपायुक्तांचे संकेत
pune steroid injections
पुणे : स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन जणांवर गुन्हा दाखल
Cartridge seized, pistol seized, person carrying pistol arrested hadapsar,
पुणे : पिस्तूल बाळगणारा मुंबईतील सराइत गजाआड, पिस्तुलासह काडतूस जप्त

गत काही दिवसांपासून मेयो रुग्णालयाच्या पार्किंगमधून वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. या दरम्यान छिंदवाडाच्या अमरवाड ठाण्याच्या पोलिसांनी तहसील पोलिसांशी संपर्क साधला. रोहित चंद्रपुरी आणि नीरज नागवंशी यांना वाहन चोरीच्या प्रकरणात अटक केली असून चौकशीत त्यांनी मेयो रुग्णालयाच्या पार्किंगमधून तीन वाहन चोरी केल्याची कबुली दिली. मात्र, न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली असल्याची माहिती दिली. या माहितीवरून तहसील पोलिसांनी गत दोन वर्षांमध्ये मेयो रुग्णालयाच्या पार्किंगमधून वाहन चोरी झाल्याच्या सर्व तक्रारींचा सखोल तपास सुरू केला. घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे दोन्ही आरोपींचा सुगावा लागला. तत्काळ एक पथक छिंदवाडासाठी रवाना झाले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी नागले, कुमरे आणि अहेके यांच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी नागले आणि अहेके यांनाही अटक केली. मात्र, कुमरे फरार होण्यात यशस्वी झाला.

हेही वाचा >>> बुलढाणा : सात हजार विदेशी एक दिवसीय मद्यसेवन परवाने वाटले, आता प्रत्येक मद्यालयात…

 ‘नंबर प्लेट’ बदलून मध्यप्रदेशात करायचे विक्री ही टोळी गत २ वर्षांपासून मेयो आणि आसपासच्या भागात सक्रिय होती. विशिष्ठ परिसरातून वाहन चोरीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटली. मात्र, ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यामुळे आरोपी बाहेर राज्यातील असल्याचा संशय पोलिसांना होता. आरोपी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची मोटारसायकल चोरी करायचे. नंतर त्या वाहनांची ‘नंबर प्लेट’ बदलून मध्यप्रदेशातील ग्रामीण भागात त्यांची विक्री करायचे. यातून मिळालेल्या पैशांवर त्यांची मौजमज्जा सुरू होती. पोलिसांनी आरोपींकडून एकूण ४० मोटारसायकल जप्त केल्या आहेत. तपासात आरोपींनी तहसील पोलिस ठाण्यांतर्गत ७, मानकापूर हद्दितून ४, सीताबर्डीतून २, कोराडी आणि धंतोली येथून एक-एक वाहन चोरी केल्याचे समोर आले. यासोबतच आरोपींनी छिंदवाडा, भोपाळ, सतनापूर आदी ठिकाणाहूनही वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले.

Story img Loader