चंद्रपूर : ज्यांच्या जीवनावर एक जाहिरात चित्रपट येत आहे, अशा जगप्रसिद्ध बांबू शिल्पकार मीनाक्षी मुकेश वाळके यांची कलाकृती इंग्लंडच्या दूतावासात पोहोचली आहे. बांबूची गणेश मूर्ती आणि मीनाक्षीने बनवलेला तिरंगा ध्वज भारतीय उच्चायुक्तालयाचे अधिकारी सुजित घोष यांना भेट देण्यात आला. २१ ऑगस्ट रोजी लंडनमध्ये झालेल्या कार्यक्रमात या दोन कलाकृती अधिकारी घोष यांना सादर करण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय उच्चायुक्तालयाने लंडन शहरात स्वातंत्र्यदिनी एका मेळ्याचे आयोजन केले होते. महाराष्ट्र मंडळ लंडनच्या माध्यमातून ग्लोबल बाप्पाच्या मीनाक्षी खोडके या जत्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ही भेट दिली. तसेच पत्र दिले. द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीनाक्षी मुकेश वाळके यांनी वंचित आणि आदिवासी महिलांसाठी अर्थपूर्ण कार्य केले आहे. आतापर्यंत तिने २०० हून अधिक महिलांना बांबू कला शिकवली आहे.

हेही वाचा : अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी आज मुलाखती

आदिवासींची बांबू राणी म्हटल्या जाणाऱ्या मीनाक्षीने बांबू कलेत जागतिक स्तरावर ओळख निर्माण केल्यानंतर आपले कौशल्य देशभरात शिकवण्याचा संकल्प केला. गुजरात, झारखंड, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांमध्ये त्यांची शिबिरे आयोजित केली जात आहेत. उल्लेखनीय आहे की, मीनाक्षी वाळके यांना इस्रायलमधील जेरुसलेम येथील आर्ट स्कूलमध्ये शिकवण्याचे निमंत्रणही मिळाले होते.

नागपूर : राजकीय टीका केल्यास कलावंत, वाहिनी सगळेच अडचणीत – समीर चौघुलेंची वास्तवदर्शी प्रतिक्रिया

कॅनडाच्या वुमन हिरो अवॉर्डसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या मीनाक्षीवर सरकारी स्पर्धा परीक्षेतही प्रश्नाचा समावेश करण्यात आला आहे. दूतावासातील आपल्या कलाकृतीच्या संदर्भात त्या म्हणाल्या की, अधिकाधिक महिलांनी स्वावलंबी व्हावे, बांबूच्या शेतीतून शेतकरी समृद्ध व्हावे, ग्लोबल वॉर्मिंगपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही उद्दिष्टे यशस्वी होण्यास मदत होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview today for post of chancelleor in dr punjabrao deshmukh agricultural university tmb 01