नागपूर : दावोस येथे झालेल्या जागतिक व्यापारी परिषदेमध्ये उद्योजकांसोबत झालेल्या एकूण ८० हजार कोटींच्या गुंतवणूक करारांपैकी ३६०० कोटींची गुंतवणूक विदर्भात होणार असल्याचा दावा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भात सुरू होऊ शकणा-या प्रकल्पांमध्ये जी.आर. कृष्णा फेरो अलॉईज प्रा. लि., कलरशाईन इंडिया, कार्निव्हल इंडस्ट्रीज, गॉयल प्रोटीन्स लि., अल्प्रोज इंडस्ट्रीज, विश्वराज इन्व्हायरमेन्ट प्रा. लि. आदी कंपन्यांचा समावेश आहे.जिल्ह्यामध्ये बुटीबोरी एमआयडीसीची १९९१ व विस्तारित एमआयडीसीची २०१२ मध्ये स्थापना केली. या क्षेत्रात एकूण ३२१० भूखंड आहेत. त्यापैकी २४२० भूखंडाचे वाटप झाले.

बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात इंडोरामा सिंथेटिक्स, मोरारजी बेम्बाना, सनविजय रोलिंग मिल, केईसी इंटरनॅशनल, दिनशॉ आईस्क्रीम, विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लि., सिएट टायर्स, स्पेसवूड, सांजफूड, इंडिगो डेनिम, इंडोवर्थ इंडिया, इनोव्हेटिव्ह टेक्सटाईल, रिलायन्स सिमेंनटेशन, वैभव प्लास्टो प्रिंटींग, एअर लिक्विड नॉर्थ इंडिया आदी १५ मोठे प्रकल्प कार्यान्वित आहेत.

विस्तारित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात इंडियन ऑईल कार्पोरेशन, गोयल प्रोटीन्स, भारत इलेक्ट्रिकल्स लि. मे. बैधनाथ बायोफयुल्स प्रा. लि., मे. एल जी. बालक्रिष्णन ॲण्ड ब्रोस, क्राफटमॅन ॲण्ड ॲटोमेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड