बुलढाणा : भाजपाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखालील मलकापूर अर्बन बँकेच्या कथित गैरव्यवहाराच्या कामकाजाची एका महिन्यात कलम ८८ अन्वये चौकशी करण्याची मागणी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी येथे केली. प्राप्त चौकशी अहवालाअंती दोषी संचालकांविरुद्ध जबाबदारी निश्चित करून वसुलीसाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

स्थानीय बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये बुधवारी १० मे रोजी दुपारी आयोजित पत्र परिषदेत बोलताना कोयटे यांनी मलकापूर अर्बनच्या गैरव्यवहारावर प्रकाश टाकला. ठेवीदार व पतसंस्थांना न्याय देण्याची मागणी करीत चौकशीसंदर्भात विविध मागण्या केल्या. यावेळी ॲड. मंगेश व्यवहारे, मलकापूर अर्बन बँक पतसंस्था ठेवीदार कृती समितीचे समन्वयक सुदर्शन भालेराव, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी हजर होते. कोयटे म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने मलकापूर अर्बन बँकेवर मागील २४ नोव्हेंबर २०२१ रोजी कलम ३५/ए नुसार बंधने घातली आहेत. अधिकारांचा गैरवापर, अनियमितपणा आणि कर्ज वसुली होत नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप कोयटे यांनी केला. परिणामी लाखो ठेवीदार व पतसंस्थांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Abdul sattar latest news in marathi
मंत्री सत्तार यांच्या संस्थेच्या २३ मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा, निवडणूक कामात हलगर्जीपणा
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
bombay high ourt remark on delay in building repairing
इमारत दुरुस्तीतील विलंब हा छळच ! उच्च न्यायालयाची टिप्पणी

हेही वाचा – वर्धा : बियाणे खरेदीच्या पावत्या जपून ठेवा; फौजदारी कारवाई करण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

यामुळे राज्यातील इतर पतसंस्थांच्या कोट्यवधी ठेवीदारांमध्ये भीती निर्माण झाली असून पतसंस्थांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याप्रकरणी महासंघाने मागील २० मार्च २०२३ रोजी औरंगाबाद येथे आंदोलन केले. यावेळी स्वतः तिथे आलेले चैनसुख संचेती यांनी ‘मी तुम्हाला रिझर्व्ह बँकेकडे घेऊन जाईल’ असे आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन त्यांनी पाळले नसून आम्ही संपर्क केल्यावर ते प्रतिसाद देत नाही.

हेही वाचा – भाजपा उमेदवार मणिकांत राठोड यांनी रचला हत्येचा कट! काँग्रेसचा गंभीर आरोप, नागपूर पोलिसात तक्रार

शुक्रवारपासून बुलढाण्यात उपोषणमुळे आम्ही पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. नव्याने आंदोलन जाहीर केल्यावर संचेती यांनी ‘मी रिझर्व्ह बँकेकडे पत्राद्वारे ठेवीदारांच्या ३० टक्के ठेवी परत करण्याची परवानगी मागितली’ असल्याचे सांगितले. मात्र या पत्राची प्रत देत नसल्याचा गौप्यस्फोट कोयटे यांनी केला. यामुळे वरील मागण्याशिवाय बँकेवर पतसंस्थांच्या प्रतिनिधींचे प्रशासक मंडळ नेमण्यात यावे, बँकेच्या कर्जदारांची यादी, त्यांच्या खात्यांचा व तारणी मालमत्तेचा तपशील मिळावा, या पूरक मागण्याही कोयटे यांनी पत्र परिषदेत केल्या. या मागण्यांसाठी बुलढाण्यात कृती समिती तर्फे १२ मे पासून उपोषण करण्यात येणार आहे, अशी घोषणा भालेराव यांनी केली.