राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांची आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधात सुरू असलेला विभागीय चौकशी समितीचा तपास पूर्ण झाला असून अहवाल कुलगुरूंकडे सोपवण्यात येणार आहे. यानंतर धवनकर यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली. यामुळे या गंभीर गुन्ह्यासाठी धवनकर यांना बडतर्फ केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा >>> अमरावती: २५ कोटींचा निधी देण्‍याच्‍या नावावर शिक्षण संस्थाचालकाची ३० लाखांची फसवणूक

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Efforts in Thane district, voter turnout
मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप

सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप असलेल्या डॉ. धवनकर यांच्या पराक्रमाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडले. हे सात प्राध्यापक धवनकर यांच्या जाळ्यात कसे सापडले, त्यांच्यावर कुठला दबाव होता, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता मात्र, विभागीय चौकशी समिती धवनकरांवर कठोर कारवाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. धवनकर प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश अजय चिंतामण चाफले यांच्या समितीने आपला अहवाल कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना सोपवला होता.

हेही वाचा >>> प्रवाशांनो लक्ष द्या…..पुढील महिन्यात चार रेल्वेगाड्या रद्द

चाफले यांनी सातही तक्रारकर्त्यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. तक्रारकर्ते शेवटपर्यंत आपल्या तक्रारीवर ठाम होते. त्यांनी धवनकर यांनी कशी फसवणूक केली याची संपूर्ण माहिती दिली. त्यावर समितीने आपल्या अहवालात धवनकर यांना दोषी ठरवले. या अहवालाच्या आधारे धवनकर यांच्याविरोधात आरोपपत्र तयार करण्यात आले. प्राथमिक चौकशी समितीने धवनकर यांची विभागीय चौकशी करावी अशी शिफारसही केली. त्यामुळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश समीर दास यांच्या समितीने धवनकर प्रकरणाची चौकशी केली. समितीचे काम पूर्ण झाले असून धवनकर यांना बडतर्फ केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.