नागपूर : शेअर बाजारात पैसे गुंतवून नफा कमावण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची तब्बल साडेदहा लाखांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी सौरभ बाबूलाल पटेल (३७) रा. लक्ष्मीनिवास, लकडगंज यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. अनिल देशमुख असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौरभ आणि अनिल यांच्यात जुनी ओळख होती. जुलै महिन्यात देशमुखने पटेल यांना शेअर बाजारात पैसे गुंतविण्यास सांगितले. नेमके पैसे कुठे गुंतवायचे याची माहिती मी देईल, असे सांगत चांगला नफा होईल, असे प्रलोभन दाखविले. पटेल यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ११ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान सौरभ यांनी आरोपी देशमुखला साडेदहा लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमधून दिले. मात्र पटेल यांना नफा मिळाला नाही.

हेही वाचा – बुकी सोंटू जैन करतोय पोलिसांची दिशाभूल! ऑनलाईन क्रिकेट ‘गेमिंग अ‍ॅप’ प्रकरण

हेही वाचा – नागपूर : एकनाथ निमगडे हत्याकांडाचा अहवाल सीबीआय न्यायालयात करणार सादर

पटेल यांनी देशमुखला विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. पटेल यांनी त्याला पैसे मागितले, मात्र देशमुखने उडवाउडवीची उत्तरे देत पैसे परत देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पटेल यांनी लकडगंज पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी देशमुखविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investing in share trading 10 lakh fraud with businessman in nagpur adk 83 ssb