वर्धा: राजकीय नेत्यांचे अभ्यास दौरे नवी बाब नाही. मात्र वेल्स सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठाकडून निमंत्रण मिळण्याची बाब जरा सन्मानाचीच म्हणावी. देशातील एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राच्या सौजन्याने हा दौरा १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
गतवर्षी स्थापनेची दोनशे वर्ष पूर्ण करणाऱ्या इंग्लंडमधील वेल्स विद्यापीठाने सुशासन व सार्वजनिक धोरण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे.विविध जागतिक आव्हानाना सामोरे जाण्यासाठी मूल्याधिष्ठित व शाश्वत नेतृत्व विकसित करण्याचे ध्येय ठेवून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
हेही वाचा… खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर… ऑटोचालकांविरुद्ध पोलीस आक्रमक; जवळपास ६०० ऑटो जप्त
यात भाजपचे आमदार डॉ.पंकज भोयर वर्धा, मिहिर कोटेचा मुलुंड, सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर, जयकुमार रावल सिंदखेड, मेघना साकोरे जिंतूर, अमित साटम अंधेरी वेस्ट, काँग्रेसचे अमीन पटेल मुंबादेवी,विश्वजित कदम पलूस कडेगाव, झिषान सिद्दीकी बांद्रा, सत्यजित तांबे अपक्ष, सेनेचे योगेश कदम दापोली, समाजवादी पक्षाचे रईस शेख भिवंडी, बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर नाला सोपारा यांचा या दौऱ्यात समावेश आहे.