कामाचे सल्लागारकडूनच चौकशीने प्रश्नचिन्ह; महापालिकेकडून ‘पारदर्शक’तेचे धिंडवडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यातील ‘पारदर्शक’ कारभाराची झलक नागपूर महापालिकेत दिसू लागली आहे. शहरातील सिमेंट रस्ते बांधणी कामाचे सल्लागारच रस्ते कामातील अनियमिततेची चौकशी (थर्ड पार्टी ऑडिट) करीत आहेत. त्यामुळे चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रस्ते कामातील अनियमिततेकडे जनमंच या स्वयंसेवी संस्थेने प्रशासन आणि शहरातील नागरिकांचे लक्ष वेधल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामांच्या चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी जनमंचच्या मागणीनुसार त्रयस्थ संस्थेकडून कामाच्या अंकेक्षणाला सुरुवात केली. महापालिकेने हे काम जिओ-टेक आणि व्हीएनआयटी यांच्याकडे दिले आहे. या दोन्ही संस्था महापालिकेच्या रस्ते बांधकामात सल्लागार ‘कन्सल्टंन्ट’ आहेत. त्यांनीच रस्त्याचे डिझाईन दिले. त्यांनी ‘मिक्स डिझाईन’ तयार केले होते. तिच संस्था त्रयस्थ म्हणून तपासणी करीत आहे. यात कोणतीही बाहेरची संस्था नाही. त्यामुळे जनमंचचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ उद्देश यशस्वी झाल्याचे दिसू येत नाही. महापालिकेची त्रयस्थ तपासणी म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे यातून स्पष्ट होते.

शहरात सिमेंट रस्त्यांची कामे दोन टप्प्यात सुरू आहेत. पहिला टप्पा अजून पूर्ण झालेला नाही आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील ‘ग्रेट नाग रोड’ अशोक चौक ते रेशीमबाग चौक आणि पुढे भोला गणेश चौक ते जगनाडे चौक दरम्यानच्या रस्त्यांना तडे गेले. काही ठिकाणी तर खड्डे पडले. अशाच प्रकारची स्थिती काही रस्त्यांची आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील रस्तेही त्याला अपवाद नाहीत. जनमंचने लॉ कॉलेज चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंतचा रस्ता, ग्रेट नाग रोड, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित रिंग रोडची सार्वजनिक तपासणी केली होती. या तपासणीत कामातील निकृष्टपणा लोकांसमोर आला होता. यामुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर टीका झाली.  दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याची दखल घेत जनमंचच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले व निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. महापालिका आयुक्तांनी देखील तत्परतेने जनमंच यांच्या शिष्टमंडळाला महापालिकेत बोलावून चर्चा केली होती. यासंदर्भातील वृत्तमालिका ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केली होती. त्यानंतर जनतेने सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाविषयी नाराजी व्यक्त केली होती.

जनमंचने सिमेंट रस्त्यांच्या त्रयस्थ तपासणीसाठी प्रतिनिधी दिला नाही. जिओ टेक कंपनीकडून सिमेंट रस्त्यांची त्रयस्थ तपासणी केली जात आहे. ती राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्याशिवाय कंत्राटदारांचे पैसे दिले जात नाहीत. ‘ग्रेट नाग रोड’ची तपासणी व्हीएनआयटीकडून केली जात आहे. यामध्ये अनेक तांत्रिक बाबी आहेत. कंत्राटदाराला पाच वर्षे रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करायची अट आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हे रस्ते दुरुस्त करून घेतले जाईल.’’

अश्विन मुद्गल, आयुक्त महापालिका 