नागपूर : बंगळुरूमधील एका गरीब कुटुंबाकडून खरेदी केलेल्या १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार केल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली.
मानवी कौर्याची सीमा ओलांडणारी ही घटना बेसा-पिपळा रोडवरील अथर्वनगरीत उघडकीस आली. तहा अरमान इशताक अहमद खान (वय ३९), पत्नी हिना (२६) आणि मेहुणा अजहर (२५) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा – नागपुरातील ‘बीआयएस’ चमूकडून जालनातील बाटलीबंद पाणी उत्पादकावर छापा
बेसा पिपळा रोडवरील अथर्वनगरी-३ येथील रो हाऊस क्रमांक १९ मध्ये तहा अरमान खान हा पत्नी हिना, दोन मुली आणि मेहुणा अजहरसोबत राहतो. तो ‘रिअल इस्टेट’चा व्यवसाय करतो. खान कुटुंब हे मूळचे बंगळुरूमधील आहेत. करोनाकाळात बंगळुरूला खान कुटुंब गेले असता हिनाच्या घराजवळ राहणारे एका गरीब दाम्पत्याला गाठले. घरी काम करण्यासाठी मुलगी हवी असल्याचे सांगितले. त्या दाम्पत्याला ७ मुली असून करोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्याने त्यांनी शिनाला (बदललेले नाव) खान कुटुंबियांना देण्याचे ठरविले. तहा अरमानने त्या कुटुंबाला ५० हजार रुपये दिले आणि शिनाला २०२१ मध्ये नागपुरात आणले.
खान कुटुंबाने शिनाला विकत आणल्याचे सांगून घरातील कामे करायचे असल्याचे बजावले. तहा अरमान, हिना आणि अजहर हे तिघेही तिच्याकडून घरातील सर्व काम करून घेत होते. शिनाकडून काही चुका झाल्यानंतर हिना तिला बेदम मारहाण करीत होती तसेच गरम सराट्याने तिला चटके देत होती.
तहा अरमान आणि अझहर या दोघांची १२ वर्षांच्या मुलीवर नजर फिरली. दोघांनीही तिचे लैंगिक शोषण सुरू केले. दोघेही तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध आणि अनैसर्गिक संबंध ठेवत होते. यादरम्यान ते तिच्याशोबत कौर्य करीत तिच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देत आसुरी आनंद घेत होते. एवढेच नव्हे तर मुलीच्या गुप्तांगात लाटने घालून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मुलीच्या छातीला सिगारेटचे चटके आणि चावा घेण्याच्या जखमा आहेत.
खान कुटुंब शिना हिला बाथरूमध्ये डांबून घराला कुलूप लावून गावी निघून जात होते. तिला काही ब्रेड देण्यात येत होत्या. तिच्यावर सलग तीन वर्षांपासून सुरू असलेल्या अत्याचारामुळे मुलगी भेदरली होती. मुलीची वैद्यकीय तपासणीदरम्यान तिच्या अंगावरील जखमा बघून डॉक्टरांचेही मन द्रवले. सध्या मुलीला महिला सुधारगृहात ठेवण्यात आले.
मुलीला शेजाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि हुडकेश्वरचे प्र. ठाणेदार विक्रांत सगणे यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी लगेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि एक पथक थेट बंगळुरू शहरात रवाना केले. गुरुवारी दुपारीच तीनही आरोपींना ताब्यात घेतले. मुलीवर वैद्यकीय उपचार केले. तिला विश्वासात घेऊन विचारपूस करीत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.