चंद्रपूर : महाराष्ट्राला राजमाता जिजाऊचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शिवबांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्याकडून प्रेरणा घेवून हजारो, लाखोंच्या संख्येने या राज्यातील महिलांना आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्व करण्याचे बळ मिळाले आहे. पण, राज्यातील विद्यमान मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला संधी मिळाली नाही. ही बाब या राज्यासाठी भूषणावह नाही. म्हणून या राज्यातील तमाम थोर महिलांचे स्मरण करून राज्य सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यामध्ये महिलांना योग्य संधी द्यावी, अशी अपेक्षा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली.

जागतिक स्तरावरील महिला दिनानिमित्त त्या सभागृहात बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या विसाव्या शतकाच्या सुरवातीला जेव्हा संपूर्ण जगातील सर्व महिलांना जगण्याचे साधे-साधे हक्क नाकारण्यात येत होते अशावेळी १९०७-०८ दरम्यान कामगार क्षेत्रातील महिला असो किंवा सामाजिक क्षेत्रातील महिला यांनी आपल्या हक्कासाठी, विशेष करून मतदानाच्या हक्कांसाठी लढा उभारला. मुक्ताबाईच्या ओवी, बहिणाबाईच्या कविता, अहिल्याबाई -ताराराणी – महारानी हिराई या विरांगणाचे शौर्य, सावित्रीमाई फुले आणि रमाबाई आंबेडकरांचा त्याग, अशा थोर स्त्रियांनी महाराष्ट्रातून कर्तृत्व संपन्न केले आहे. सभागृहाने महिलांना उन्नतीची द्वारे खुली करणारे अनेक एतिहासिक निर्णय घेतले आहेत. या सभागृहाने तयार केलेल्या धोरणांनी या देशालासुद्धा दिशा देण्याचे काम केले आहे, अशी स्तुती आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
devendra fadnavis gadchiroli guardian minister
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!
industry minister uday samant
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश

हेही वाचा – बुलढाणा : बिबट्याचा हल्ल्यात तीन शेतकरी गंभीर जखमी

स्वातंत्र्यापासून या देशातील, या राज्यातील महिलांनी प्रगतीची मोठी झेप घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तरतूद केलेल्या हिंदू कोड बिलमुळे स्वातंत्र्योत्तर काळात महिलांना संधीची कवाडे खुली झाली. महाराष्ट्र राज्याने या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पण, आजही आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत आहे. ज्यामुळे महिलांना खरच समाज आणि विशेष करून पुरुष सन्मानाच्या आणि समानतेच्या नजरेने बघतात का, हे सुद्दा तपासले पाहिजे. राज्याच्या विधानसभेत जर एका सन्माननीय महिला आमदारासाठी आपल्या लेकराला स्तनपान करण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येत असेल, तर या राज्यातील लाखोंच्या संख्येने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या आमच्या भगिनींची काय अवस्था असेल, याचा विचार महिला दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे, असे धानोरकर म्हणाल्या.

हेही वाचा – महिलाराज! चंद्रपूर जिल्ह्यात महिलांनी सांभाळली पोलीस ठाण्याची जबाबदारी

या देशातील नव्हे या राज्यातील शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नियमित महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा, योग्य वेतन यासारख्या सुविधा देण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनेत, खासगी शिक्षण संस्थेत संस्थांमध्ये विद्याज्ञानाचे पवित्र काम करणाऱ्या कंत्राटी तत्त्वावर असणाऱ्या महिलांची अवस्था अतिशय दयनीय आहे. या महिलांना प्रसुती रजा, योग्य वेतनमान, कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि सन्मानासाठी संघर्ष करावा लागतो. ही परिस्थिती व्यक्त करताना मला वेदना होत आहेत. मागील तीन वर्षांपासून मी या सभागृहाची सदस्य आहे. परंतु माझ्यासकट या सभागृहातील कोणत्या सन्मानीय सदस्याने, संपूर्ण संभागृहाने या गंभीर मुद्द्यावर साधक-बाधक चर्चा करून एखादा ठोस निर्णय घेतल्याचे किंवा एखादे अतिशय परिणामकारक धोरण घोषित केल्याचे मला तरी आठवत नाही. एखाद्या नटीच्या तोकड्या कपड्यांवर राज्यात चर्चा घडविली जाते. राजकीय पक्ष आंदोलन करतात, माध्यमे चर्चा करतात. परंतु अध्यक्ष आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आजही आमच्या माय माऊलींना परिस्थितीमुळे अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे मिळत नाही. शेतकऱ्यांच्या महिलांना ठिगळ लावून अंग झाकावे लागते. यावर मात्र राजकीय पक्षांना बोलण्यासाठी सवड नाही. माध्यमांना चर्चा करायला वेळ नाही. एखाद्या राजकीय पक्षाने आंदोलन केलेलेसुद्धा बघायला मिळत नाही. म्हणून या राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या विशेष करून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि सन्मान मिळाला पाहिजे. या दिशेने या सभागृहाने काहीतरी ठोस निर्णय घेवून राज्यातील आमच्या तमाम माता-भगिनींना महिला दिनाची भेट द्यावी, ही अपेक्षा धानोरकर यांनी व्यक्त केली.

Story img Loader