नागपूर: गणेशोत्सवानंतर सोन्याचे दर सातत्याने कमी होऊन सोमवारी (९ ऑक्टोंबर) सकाळी ५७ हजार ७०० रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. हे दर लवकरच वाढण्याचे संकेत असल्याने दिवाळीतील सोन्याची खरेदी आताच करणे ग्राहकांसाठी फायद्याची असल्याचे मत नागपुरातील सराफा व्यवसायिकांनी नोंदवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरात सोन्याचे दर ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०.३१ वाजता प्रति दहा ग्राम ५७ हजार ३०० रुपयांपर्यंत आले होते. परंतु ९ ऑक्टोंबरला दरात किंचित वाढ होऊन ते ५७ हजार ७०० रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. आता दर कमी असल्याने दिवाळीतील सोने खरेदी आता करणे फायद्याचे असून लवकरच हे दर ६० हजाराहून अधिकवर जाण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांनी नोंदवले.

हेही वाचा >>> मान्सून माघारी फिरताच उन्हाच्या झळा तीव्र; राज्यातील नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’ चा अनुभव

नागपुरातील सराफा बाजारात ९ ऑक्टोंबरला प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५७ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५४ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३७ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ६९ हजार ७०० रुपये होते. हे दर ७ ऑक्टोंबरला प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्यासाठी ५७ हजार ३०० रुपये, २२ कॅरेट ५४ हजार ४०० रुपये, १८ कॅरेट ४५ हजार ८०० रुपये, १४ कॅरेट ३७ हजार २०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ६९ हजार १०० रुपये होते. हे दर लवकरच वाढण्याची शक्यता रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी वर्तवली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is beneficial to buy gold in diwali price hike signal mnb 82 ysh
Show comments