वर्धा: शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. मात्र तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. नागरिक विविध कामांसाठी शासकीय कार्यालयात येतात तेव्हा अधिकारी कोण व कोणत्या खात्याचा हे समजत नाही. तसेच ते जेव्हा विचारणा करतात तेव्हा ओळखपत्र दाखविल्या जात नाही. असे अधिकार व कर्मचारी असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना वरिष्ठांना देण्यात आली होती. पण त्याची पण अंमलबजावणी होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याचे आज सामान्य प्रशासन विभागाने एका परिपत्रकातून नमूद केले. आता कार्यालयात प्रवेशा वेळी पोलिसांनी तपासणी करावी. ओळखपत्र नसणाऱ्यांची नावे संबंधित विभागास पाठवावी. विभाग प्रमुखांनी अश्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्याचा मासिक अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Story img Loader