गोंदियाः देशातील पंतप्रधान पदाची एक गरिमा आहे. त्यामुळे पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तींनी ती राखावी अशी देशाची अपेक्षा असते. पण एक पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने देशातील मुख्य न्यायाधीशांच्या घरी गणपतीपूजेच्या निमित्त करून जाणे हे शोभनीय नाही. यामुळे देशातील न्याय व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडतो. न्याय व्यवस्थेला संशयात्मक पद्धतीने बघितले जात असेल तर हे देशाकरिता योग्य नाही, अशी टीका महाराष्ट्र कॉग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथल्ला यांनी गोंदियात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ते गोंदिया येथील सर्कस ग्राउंड वर आयोजित कांग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा, माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा पक्षप्रवेश व नवनिर्वाचित खासदार यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, विरोधी पक्ष नेते विजय वडेटीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, डॉ. नितीन राउत, सुनील केदार, सतीश चतुर्वेदी, नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे, नामदेवराव किरसान, श्याम बर्वे, माजी खासदार शिशुपाल पटले, मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्हयातील आमदार अनुभा मुंजारे, मधु भगत, विक्की पटेल, माजी आमदार हिना कावरे, गोंदिया जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष व माजी आमदार दिलीप बंसोड आदि उपस्थित होते.

हे ही वाचा…यवतमाळ : ट्रकची धडक , दुचाकी चाकाखाली…पण, चालकाने चक्क बोनेटला पकडून…

दिपप्रज्वल व महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पुढे रमेश चेनीथल्ला म्हणाले, की देशातील भ्रष्टाचार करणा-यांना आधी भारतीय जनता पक्षांनी आपल्या सोबत घेतले व नंतर त्यांच्या काळ्या कृत्यावर पांघरून घालण्याचे काम भाजप देशभरात करीत असल्याचा आरोप करित गोपालदास अग्रवाल यांनी वेळेवर आपल्या निर्णय घेत या भ्रष्टाचा-यांची साथ सोडली, याबद्दल त्यांचे कॉग्रेस पक्षात स्वागत करीत असल्याचे चेनीथल्ला म्हणाले.

हे ही वाचा…चंद्रपूर: काँग्रेस मायावी रावण, सावध रहा…..भाजप नेत्याच्या वक्तव्याने……

भाजपची दलाली करणा-या त्या स्वनामधन्य नेत्यांने या पुढे आमच्यात पडू नये : पटोले

आमच्या गोंदिया भंडारा जिल्हयात एक नेता आहे, त्या माणसाने काँग्रेस संपवण्याचे काम कसे करता येईल हेच केले आहे. आता भाजपच्या कंपूत राहून ते पुढील विधानसभा निवडणुकीत आमच्या विरोधात अपक्ष उमेदवारांना रिंगणात उतरवून कॉग्रेसच्या उमेदवारांना पाडण्याच काम ते करणार आहे. परंतु, आम्ही त्या नेत्याला आताच इशारा देउन ठेवतो की गोंदिया भंडारा जिल्हयातील ७ ही विधानसभा मतदारसंघात आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवारच निवडून आणणार आहे. त्या नेत्याने भांडण लावण्याचे काम बंद करावे. गोंदिया-भंडारा जिल्हयाला विकासाचे गाजर दाखवून या दोन्ही जिल्हयाचा विकास खुंटवणा-या त्या नेत्याला आज या कांग्रेस पक्षाच्या मेळाव्यातून पुढे गप्प राहण्याचा इशाराच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षरित्या खा. प्रफुल पटेलांचे नाव न घेता दिला आहे. त्या नेत्यामुळेच मला आणि गोपालदास अग्रवाल यांना भ्रष्ट भाजपचा प्रवास करून यावे लागले. यात आम्हा दोघांना किती राजकीय त्रास सहन करावा लागला हे दोघांना ठाउक अल्याचेही नाना म्हणाले. आमचे नेते राहुल गांधी यांनी नेहमीच आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. मात्र, विरोधी पक्षाचे नेते चुकीचा अर्थ काढून आमच्या नेत्यांविषयी गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. मुळात भाजप हा पक्षच आरक्षणाचा विरोधक आहे. आज ही ते जातीगत जनगणना करण्यास टाळाटाळ करते या वरून सामान्य नागरिकांनी आता यांच्यापासून सजग राहून संविधानाच्या रक्षणाकरिता संघटित राहून कांग्रेस पक्षाला आपला पाठिंबा दयावा असे आवाहन या प्रसंगी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

हे ही वाचा…नागपूर : रोगमुक्तीनंतरही मुक्काम खाटेवरच ,शासकीय रुग्णालयात ……

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बसोड यांनी केले. तर या काग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चौहान, नितीन राउत, सुनिल केदार, गोपालदास अग्रवाल, आमदार सहेसराम कोरेटी आदींनी संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. राष्ट्र‌गीताने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is not good for person holding post of prime minister visiting house of chief justice of country on occasion of ganapati puja sar 75 sud 02