गोंदिया : राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर येणार अशा बातम्या येत आहेत. पण, ते काही खरे नाही. केवळ अफवा पसरवली जात आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशी भेटीची शक्यताच फेटाळून लावली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गोंदिया जिल्हयात आले असता ते माध्यमांशी बोलत होते. पटोले म्हणाले, विरोधकांनी महाविकास आघाडीच्या नागपुरात होणाऱ्या वज्रमूठ सभेला विरोध दर्शविला. मात्र, न्यायालयाने वज्रमूठ सभेला परवानगी दिली. आता भाजपाला सभा बघूनच कळेल की महाविकास आघाडीची वज्रमूठ किती मजबूत आहे.

Chandrapur tiger death marathi news
चंद्रपूर : आठ महिन्यांच्या वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Deadly attack on NCP taluka president Sunil Kolhe in Buldhana
बुलढाणा : खळबळजनक! राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला
Neerva female leopard gives birth to cubs in Kuno National Park in Madhya Pradesh
कुनोत पुन्हा एकदा पाळणा हलला.. मादी चित्ता ‘निरवा’ने..
How did Aleem Patel of Azad Samaj Party get 54 thousand 591 votes
अलीम पटेल यांना चक्क ५४ हजार मते; कशी साधली किमया…
Railway Minister Ashwini Vaishnav visited Deekshabhoomi
रेल्वेमंत्री अचानक पोहोचले दीक्षाभूमीवर… निवडणुकीआधी त्यांचा…
Dadarao Keche decided to retire from politics and changed his stance again
निकालाच्या एक दिवसाआधी राजकीय संन्यास; पण, पक्ष विजयी होताच माजी आमदाराने…
Zeenat tigress from Tadoba reached forest of Similipal
ताडोबातील ‘झीनत’ सिमिलीपालच्या जंगलात पोहोचली…
women runs away after throwing baby behind tree
चिमुकल्याला झाडामागे फेकून आई झाली पसार… अंगावरील जखमांना मुंग्या…

हेही वाचा – भंडारा अर्बन बँकेच्या सहा संचालकांचे अचानक राजीनामे; सहकार क्षेत्रात वादळ

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीका, टिंगल करण्यापलीकडे दुसरे कोणतेच काम नाही. त्यांनी आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. किमान महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या तरी सुटतील, असेही पटोले म्हणाले.