लोकसत्ता टीम

नागपूर : शहरातील मोठमोठ्या ‘ओयो’ हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे उघडकीस आले असून बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात १५ वर्षांच्या मुलीला देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी हॉटेल मालक राकेश बलवीरसिंह चावला (५५) आणि मुलगा आशिष राकेश चावला (रा. छत्रपती चौक) यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील सत्य नेमके काय?
Tempo transporting gutkha caught goods worth 18 lakhs seized
गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Gisele Pelicot
पत्नीवर १० वर्षे ५० हून अधिक लोकांकडून बलात्कार, पती आढळला दोषी; फ्रान्सला हादरवणारे सामूहिक बलात्कार प्रकरण काय?

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे सुरु असून त्याला पोलीस आणि गुन्हे शाखेचे एसएसबी पथकातील कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण सहकार्य आहे. त्यामुळे मनिषनगर परिसरातील अनेक हॉटेल्स आणि ओयो हॉटेल्समध्ये देहव्यापार पोलिसांच्याच आशिर्वादाने सुरु असल्याचे समोर आले आहे. मनिषनगरातील श्रीजी ऑटोमोबाईल्सजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळील कृष्णकुंज ओयो हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींना आंबटशौकीन ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची माहिती होती. हॉटेल मालक राकेश चावला आणि आशिष चावला हे दोघेही बापलेकांनी काही अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी हॉटेलमध्ये बोलविण्याच्या कामासाठी तिघांना ठेवले होते. व्यवस्थापक धीरज रविंद्र खुळे (राकेश लेआऊट), गजानन रामहरी सोनवणे (४०, अमर संजय सोसायटी, मनिषनगर) आणि अलोक राजेंद्र रैकवार (सिद्धिविनायक मंदिरजवळ,रमानगर) या तिघांनी ८ ते १० तरुणी आणि अल्पवयीन मुलींना ओयोमध्ये ठेवले होते. तेथे आंबटशौकीन ग्राहकांना ५ ते १०हजार रुपये घेऊन मुली उपलब्ध करून देत होते. मात्र, मुलींना ५०० ते हजार रुपये देऊन त्यांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण करण्यात येत होते.

आणखी वाचा-धक्कादायक! आईला मारहाण केल्याच्‍या राग, मुलाने केली वडिलांची हत्या…

एसएसबी पथक देहव्यापाराच्या अड्ड्यांवर कारवाई करीत नसल्याचे लक्षात येताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक श्याम सोनटक्के, सहायक निरीक्षक अयुब संदे, अविनाश जायभाये यांच्या पथकाने मनिषनगरातील श्रीजी ऑटोमोबाईल्सजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळील कृष्णकुंज ओयो हॉटेलवर छापा घातला. १५ वर्षाच्या मुलीला ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेतले. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे सुरु आहेत. एसएसबी पथकातील काही कर्मचाऱ्यांचे थेट सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एसएसबी पथकात जुनेच कर्मचारी असल्यामुळे छापा घालण्याचा धाक दाखवून संबंध ठेवण्यात काही कर्मचारी पटाईत आहेत. डीबी पथक आणि गुन्हे शाखेच्या एसएसबी पथकाचे कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने देहव्यापाराचे अड्डे सुरु असल्याची चर्चा आहे.

Story img Loader