नागपूर : शहरातील प्रत्येक रुग्णालयातून जैववैद्यकीय कचरा जमा करण्याची महापालिकेची विशेष यंत्रणा आहे. मात्र, मेडिकलच्या आवारातच कचऱ्यासोबत जैववैद्यकीय कचरादेखील जाळण्यात येत असल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. यावर महापालिका प्रशासनाने मेडिकल प्रशासनाला नोटीस बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेडिकल प्रशासनाने मात्र अज्ञात व्यक्तीने कचरा जाळला असून तो जैववैद्यकीय कचरा नसल्याचे सांगितले. पर्यावरणकर्ता कुणाल मौर्या गुरुवारी काही कामानिमित्त मेडिकलला गेले असता त्यांना अधिष्ठातांच्या कार्यालय परिसरातच मोठ्या प्रमाणावर कचरा जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता उपचारासाठी वापरला जाणारा कापूस, काही औषधांचे डबे असे जैववैद्यकीय साहित्य त्यांना दिसून आले. दरम्यान, त्यांनी मेडिकल प्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर महापालिकेचे उपद्रव शोध पथक त्याठिकाणी पोहोचले व त्यांनीही येथे जैववैद्यकीय कचरा नसल्याची नोंद केली. साधा कचरा असल्याचे सांगून केवळ उघड्यावर केला. कचरा जाळण्यात येत असल्याबद्दल सामान्य माणसांना तातडीने पाच हजार रुपयाचा दंड आणि मेडिकल प्रशासनाला मात्र नोटीस असा दुजाभाव का, असा प्रश्न पर्यावरण अभ्यासकांनी उपस्थित केला.

हेही वाचा – मोकाट श्वानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागपूर महापालिका उपाययोजना करण्यात अपयशी

नागरिकांना दंड, सरकारी यंत्रणांना नोटीस

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी आणली आहे. तरीही शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना तातडीने दंड करणारी महापालिका सरकारी यंत्रणांना केवळ नोटीस देऊन सोडत आहे. प्रशासनाला याबाबत सांगितले. पण त्यांनी हा जैववैद्यकीय कचरा नसून साधा कचरा असल्याचे सांगत नोटीस बजावली, असे पर्यावरणकर्ता कुणाल मौर्या म्हणाले.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Video-2023-04-14-at-9.48.34-AM.mp4
व्हिडिओ – लोकसत्ता टीम

नागरिक त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी मेडिकलला येतात आणि त्याठिकाणी कचरा जळत असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करते, हे दुर्दैवी आहे. कचरा जाळल्याने वायू प्रदूषण होते ज्याचा थेट परिणाम लोकांच्या फुफ्फुसांच्या आरोग्यावर होतो, असे सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, संस्थापक, लीना बुद्धे म्हणाल्या.

हेही वाचा – नागपूर: ‘लग्न केल्यास तुझे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर टाकून व्हायरल करेन…’

मेडिकल परिसरात रद्दी पडली होती आणि अज्ञात व्यक्तीने ती जाळली. येथे कोणताही जैववैद्यकीय कचरा जाळण्यात आला नाही. याची चौकशी करण्यात येत आहे, असे मेडिकल रुग्णालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, संजीव देशमुख म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It was revealed on thursday that biomedical waste is being burnt along with the waste in the premises of the medical facility nagpur rgc 76 ssb
Show comments