नागपूर : धावत्या रेल्वेगाडीत पाणी संपल्यानंतर प्रवाशांची होणारी असुविधा आता टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी रेल्वेच्या प्रत्येक डब्यातील पाण्याची पातळी सांगणारी यंत्रणा विकसित केली आहे. रेल्वे डब्याच्या टाकीत ४० टक्के पाणी असतानाच रेल्वे प्रशासनाला स्वयंचलित पद्धतीने भ्रमणध्वनीवर आणि संगणकावर लघुसंदेशाद्वारे याबाबत सूचना मिळणार आहे.

मध्य रेल्वेने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी डब्यातील पाण्याच्या पातळीचे थेट निरीक्षण करणारी यंत्रणा विकसित केली आहे. याशिवाय एलएचबी डबे (जर्मनीमध्ये विकसित) आणि वंदे भारत एक्सप्रेसच्या सर्व डब्यांमध्ये पाश्चिमात्य पद्धतीच्या शौचालयाच्या आसनावर स्वयंचलित झाकण बसवण्यात आले आहे. धावत्या रेल्वेगाडीत डब्यांमधील टाक्यांमध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आधारित यंत्रणा मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विकसित केली आहे.

New road from private land to exit Virar station platform
विरार फलाटावरून बाहेर पडण्यासाठी खासगी जागेतून नवीन रस्ता; अडथळ्यातून प्रवाशांची सुटका
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Pune Municipal Corporation cleanliness drive on pedestrian bridges Pune news
अडलेले ‘पाऊल’ पडले पुढे! पादचारी पूल आवश्यक ठिकाणीच; असलेल्या पुलांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम
Chandrapur , Bus Tap Karo,
चंद्रपूरच्या ध्येयवेड्या तरुणांनी स्थापन केली ‘बस टॅप करो’ कंपनी
Chandrapur marathi news
चंद्रपूर : सफाई कामगार, शिल्पनिदेशक पदांसाठी ३५ हजारांची लाच, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या…
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

हेही वाचा – नागपूर : धक्कादायक! घरातच छापल्या बनावट नोटा, गेमिंग ॲपवर जुगार खेळण्याचे व्यसन

जेव्हा जेव्हा पाण्याची पातळी क्षमतेच्या ४० टक्केच्या खाली जाते, तेव्हा भ्रमणध्वनी किंवा संगणकावर त्वरित सूचना मिळते. त्यामुळे पुढील रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडी पोहचण्यापूर्वीच संबंधितांना कळवले जाते. या यंत्रणेच्या चाचणीसाठी नागपूरमार्गे धावणारी एलटीटी (मुंबई)-शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या ११ डब्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे.

शौचालयाचे झाकण आपोआप बंद

रेल्वेच्या मुंबई विभागाने पाश्चिमात्य पद्धतीच्या शौचालयावर आपोआप बंद होणारे झाकण बसवले आहे. अशाप्रकारचे झाकण रेल्वेतील सर्व एलएचबी डब्यांमध्ये तसेच वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये बसवण्यात येणार आहे. ऑटोमॅटिक सीट कव्हरमध्ये, स्प्रिंग सीट कव्हर नेहमी त्याच्या ‘लिफ्ट अप पोझिशन’मध्ये ठेवते. जेव्हा एखाद्या प्रवाशाला शौचालय वापरायचे असते, तेव्हा तो सहजपणे खाली ढकलून देऊ शकतो. जोपर्यंत एखादी व्यक्ती त्याचा वापर करत असेल तोपर्यंत ते खालच्या स्थितीत राहील, अन्यथा ते आपोआप सामान्य स्थितीत परत येईल.

हेही वाचा – नागपूर : पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली

“गाडीच्या डब्यांच्या रोलर बेअरिंग तापमानाचे निरीक्षण करून प्रवाशांना सुरक्षितता आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करणे तसेच डब्यांमधील टाक्यांमध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विभागाने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आधारित यंत्रणा विकसित केली आहे.” – शिवराज मानसपूरे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Story img Loader