वर्धा: महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आयटीआय व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमात यावर्षी पासून प्रवेश घेता येणार आहे. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नामवंत उद्योग समूहात नोकरी व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑन जॉब ट्रेनिंग स्वरूपात हे शिक्षण राहणार. या विद्यापीठाच्या बी टेक व बीबीए पदवीसह पुढील वाटचाल नव्या उंचीवर नेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार.राज्यातील युवक युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त कौशल्याधरित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी या कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा… ‘उशिरा आला, पण वेळेआधीच देश व्यापला’… मान्सूनची घोडदौड

शिक्षण घेत असतानाच करिअरच्या वाटा खुल्या होतील.उद्योगात प्रशिक्षण घेतल्यानंतर तसे प्रमाणपत्र विद्यापीठ देईल.विद्यार्थ्यांच्या कुशलतेवर त्यामुळे शिक्कामोर्तब होणार.भविष्यात त्याचा फायदा नौकरी प्राप्त करण्यासाठी होणार आहे.या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iti and 12th passed students will get job during education pmd 64 dvr
Show comments