नागपूर : घटनाकारांनी संविधान लिहितांना राज्यकारभार सुव्यवस्थित चालावा यासाठी तत्कालिन परिस्थिती लक्षात घेतली होती. त्यावेळी कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रशासकीय मंडळांचे कार्य काय असावे, हे त्यात नमूद केले होते. परंतु, आतापर्यंत बदलेला काळ आणि बदलत जाणारी परिस्थिती बघता वारंवार घटनेतील काही तरतुदींमध्ये दुरुस्ती करावी लागली. त्यामुळे सध्याच्या स्थितीत काही तरतुदींमध्ये दुरुस्ती होणे साहजिकच आहे, असे प्रतिपादन जे. साई दीपक यांनी केले. ते आज ‘आयएमए’ सभागृहात मंथन संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

जे. साई दीपक म्हणाले की, राष्ट्रभक्तीसाठी कोणताही ‘शॉर्टकट’ नाही. राष्ट्रभक्ती प्रत्येकाच्या रक्तात असली पाहिजे. देशातील संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने जीव लावून झटले पाहिजे. हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी इतिहास आणि संस्कृती जपण्याची गरज आहे. इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळविल्यानंतर भारताला एकसंघ करण्यासाठी तसेच राजेशाही नष्ट होऊन लोकशाही आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीतून संविधान निर्माण करण्यात आले. त्यातून देशात सुव्यवस्था व शांतता नांदेल याची तरतुद करण्यात आली होती. काळानुरूप घटनेतील काही तरतुदींमध्ये बदल किंवा दुरुस्त्या करण्यात आल्या.

maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

हेही वाचा: रोमहर्षक हवाई कसरतींनी नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

भविष्यातही परिस्थिती बदली तर तरतुदींमध्ये बदल करावा लागणे स्वाभाविक आहे. आता देशात मुलांना नितीमूल्य, संस्कृती, इतिहास, धर्मिक ज्ञान देणे गरजेचे आहे. देशातील प्रत्येक राजकीय नेता भ्रष्टाचारी नाही. परंतु, जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या कृत्यामुळे देश पोखरत जात आहे. अनेक जण देशभक्ती फक्त प्रसारमाध्यमांवरूनच दाखवतात. जे प्रसारमाध्यमांवर दाखवल्या जाते, त्यावरच लोकांचा विश्वास बसतो, असेही साई दीपक म्हणाले. सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांचे समाधान होईपर्यंत त्यांनी उत्तरे दिली, हे विशेष.