राजेश्वर ठाकरे
‘तो’ दारूगोळा निकृष्ट?
मध्यप्रदेशातील जबलपूर (खमेरिया) कारखान्यात तयार करण्यात आलेल्या दारूगोळ्याची गुणवत्ता योग्य नसल्यानेच तो नष्ट करण्यात येत होता, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. संरक्षण साहित्य निर्मितीची माहिती अतिशय गोपनीय असल्याने उत्पादनाच्या गुणवत्तेत झालेल्या ढिलाईची चर्चा होत नाही. मात्र, ते नष्ट करताना किंवा इतर कारणांमुळे दुर्घटना झाली तर सत्य बाहेर येते. पुलगाव केंद्रीय दारूगोळा आगाराच्या परिसरात झालेला स्फोट हा ‘अशाच प्रकारचा’ आहे. या घटनेमुळे खमेरियाच्या कारखान्यातील भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुलगावमध्ये काही महिन्यांपासून दारूगोळा नष्ट करण्यात येत आहे. हा दारूगोळा कालबाह्य़ झालेला नाही, तर त्याचे उत्पादन दर्जेदार नसल्याने लष्कर तो वापरू शकत नाही. चाचणीत दारूगोळा अयशस्वी झाल्याने त्याचे उत्पादन थांबण्यात आले. पुलगाव येथील दारूगोळा आगाराच्या परिसरात तो नष्ट केला जात आहे. त्याची किंमत कोटय़वधी रुपये आहे. मात्र, दर्जाहीन उत्पादन करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही.
पुलगाव येथील दारूगोळा भांडार हे देशातील सर्वात मोठे भांडार आहे. सुमारे ७ हजार एकरमध्ये असलेल्या भांडार परिसराात कालबाह्य़ दारूगोळा नष्ट करण्याची व्यवस्था आहे.
या भांडारात ३० मे २०१६रोजी भीषण आग लागली होती. त्यात लष्कराचे १९ जवान शहीद झाले आणि १७ जवान जखमी झाले होते. त्यानंतर दोनच वर्षांत पुन्हा येथे दुर्घटना घडली आहे. प्रथम दर्शनी हे मानवी चुकीमुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, स्फोटके वापरताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत आहे. एवढे संवेदनशील घटक हातळण्यासाठी अकुशल, अल्पशिक्षित मजुरांचा वापर होत आहे. यापूर्वी देखील येथे दोनदा स्फोट झाले आहेत.
‘‘दारूगोळा अतिशय संवेदनशील घटक आहे. कालबाह्य़ दारूगोळा नष्ट करताना काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक असते. या प्रकरणात प्रथमदर्शनी मानवी चूक असल्याचे दिसून येते.’’
– रवि थोडगे, लेफ्ट जनरल, निवृत्त.