बुलढाणा:शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करून जमवलेल्या गडगंज रक्कमेतून आरोपी जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉन याने  तब्बल ५.७६ कोटींची मालमत्ता खरेदी केली. मलकापूर शहर पोलिसांच्या आजवरच्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. यातील काही मालमत्ता जप्त करण्यात आली असून उर्वरित मालमत्तेच्या जप्तीची कार्यवाही सुरू आहे.

मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील रहिवासी असलेल्या जग्गू डॉनने शेकडो शेतकऱ्यांचा कापूस जादा भावाने खरेदी केला.  बाजारात ७ ते ८ हजाराचा भाव असताना त्याने ९ हजार रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी केला. प्रारंभी त्याचा मोबदला वेळेवर मिळाल्याने शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास वाढला. यानंतर कोट्यवधींचा कापूस ‘बोलीवर’ घेऊन तो फरार झाला.

farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई
jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले
wheat, Guaranteed price, central government ,
हमीभावाने गहू खरेदीतून काढता पाय? जाणून घ्या, केंद्र सरकारने गहू खरेदीबाबत कोणता निर्णय घेतला
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
GST department arrested two brothers in Solapur for evading Rs 10 83 crore GST
सोलापुरात दोघा व्यापारी बंधूंनी १०.८३ कोटींचा जीएसटी बुडविला, जीएसटी विभागाकडून अटकेची कारवाई
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन

हेही वाचा >>>नागपूर: गर्भवती महिलेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या, परिसरात मात्र घातपाताची चर्चा…

नाशिकच्या सेक्युरिटी प्रेस चे सहकार्य

मलकापूर शहर पोलिसांनी जग्गू विरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रारंभी जगनचे साथीदार राजेश पाटील व शरद बोरले यांना अटक केली. त्यानंतर जग्गू डॉनने खरेदी केलेले १० लाख रुपयांचे रंगीत मुद्रण यंत्र ( ऑफसेट मशिन) व १० लाखांच्या दोन छोट्या मशिन मलकापूरमधून जप्त केल्या. ही यंत्रे नकली नोटा छापण्याकरिता आणल्याचा संशय आल्याने पोलिसांनी नाशिक येथील ‘सेक्युरिटी प्रेस’ व  सांताक्रूझ, मुंबई येथील न्याय सहायक प्रयोगशाळेचा अभिप्राय मागविला आहे. आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>CBSC Exam 2024: सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सूचना

खान्देश मध्ये खरेदी, अकोल्यात गुंतवणूक!

 आजवरच्या तपासात मुख्य आरोपी नारखेडे याने फसवणुकीच्या रक्कमेतून कोट्यवधीची मालमत्ता खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.  पत्नी जयश्री नारखेडे हिच्या नावाने  मलकापूर येथे २ गाळ्यांचे दुकान, फ्लॅट, ३१ लक्ष रुपयांची कार, भालेगाव येथे ७० लाखांची शेती खरेदी केली आहे. तसेच आपल्या दलालांना २० ते २५ कोटींची रक्कम दिली आहे. ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली की नाही याचाही तपास करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील खंडेलवाल जिनिंग खरेदी करण्यासाठी २ कोटींची सौदापावती केली आहे. आठ गावकऱ्यांच्या मदतीने अकोला जिल्ह्यात ‘सोलर प्रोजेक्ट’ उभारला असून त्यात २ कोटींची गुंतवणूक केली आहे. पुढील तपासात आणखी काय उघड होते, याकडे फसवणूकग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Story img Loader