बुलढाणा:शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करून जमवलेल्या गडगंज रक्कमेतून आरोपी जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉन याने तब्बल ५.७६ कोटींची मालमत्ता खरेदी केली. मलकापूर शहर पोलिसांच्या आजवरच्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. यातील काही मालमत्ता जप्त करण्यात आली असून उर्वरित मालमत्तेच्या जप्तीची कार्यवाही सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील रहिवासी असलेल्या जग्गू डॉनने शेकडो शेतकऱ्यांचा कापूस जादा भावाने खरेदी केला. बाजारात ७ ते ८ हजाराचा भाव असताना त्याने ९ हजार रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी केला. प्रारंभी त्याचा मोबदला वेळेवर मिळाल्याने शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास वाढला. यानंतर कोट्यवधींचा कापूस ‘बोलीवर’ घेऊन तो फरार झाला.
हेही वाचा >>>नागपूर: गर्भवती महिलेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या, परिसरात मात्र घातपाताची चर्चा…
नाशिकच्या सेक्युरिटी प्रेस चे सहकार्य
मलकापूर शहर पोलिसांनी जग्गू विरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रारंभी जगनचे साथीदार राजेश पाटील व शरद बोरले यांना अटक केली. त्यानंतर जग्गू डॉनने खरेदी केलेले १० लाख रुपयांचे रंगीत मुद्रण यंत्र ( ऑफसेट मशिन) व १० लाखांच्या दोन छोट्या मशिन मलकापूरमधून जप्त केल्या. ही यंत्रे नकली नोटा छापण्याकरिता आणल्याचा संशय आल्याने पोलिसांनी नाशिक येथील ‘सेक्युरिटी प्रेस’ व सांताक्रूझ, मुंबई येथील न्याय सहायक प्रयोगशाळेचा अभिप्राय मागविला आहे. आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>CBSC Exam 2024: सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सूचना
खान्देश मध्ये खरेदी, अकोल्यात गुंतवणूक!
आजवरच्या तपासात मुख्य आरोपी नारखेडे याने फसवणुकीच्या रक्कमेतून कोट्यवधीची मालमत्ता खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नी जयश्री नारखेडे हिच्या नावाने मलकापूर येथे २ गाळ्यांचे दुकान, फ्लॅट, ३१ लक्ष रुपयांची कार, भालेगाव येथे ७० लाखांची शेती खरेदी केली आहे. तसेच आपल्या दलालांना २० ते २५ कोटींची रक्कम दिली आहे. ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली की नाही याचाही तपास करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील खंडेलवाल जिनिंग खरेदी करण्यासाठी २ कोटींची सौदापावती केली आहे. आठ गावकऱ्यांच्या मदतीने अकोला जिल्ह्यात ‘सोलर प्रोजेक्ट’ उभारला असून त्यात २ कोटींची गुंतवणूक केली आहे. पुढील तपासात आणखी काय उघड होते, याकडे फसवणूकग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.