बुलढाणा : जिल्ह्याची औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव येथील ‘एमआयडीसी’ मधील एका कारखान्याला आज, मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खामगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मधील जगदंबा ऍग्रो इंडस्ट्रीज या प्रकल्पाला दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. पाहतापाहता या आगीने भीषण स्वरूप धारण केले. याची माहिती मिळताच खामगाव नगरपरिषदेसह अन्य ठिकाणचे अग्निशमन दल दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पाऊण तासानंतर ही आग आटोक्यात आल्याचे सांगण्यात आले. या भीषण आगीत किती नुकसान झाले याची यंत्रणांकडून पाहणी करण्यात येत आहे.