लोकसत्ता टीम

गडचिरोली : पोलीस शिपायाचे अपहरण करून हत्या, जाळपोळ, आदी गुन्ह्यात आरोपी असलेल्या नक्षल समर्थकास (जनमिलिशिया) भामरागड येथे नाकाबंदीदरम्यान अटक करण्यात आली. पेका मादी पुंगाटी (४९, रा. मिरगुळवंचा, ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस होते.

Police detained three Bangladeshis living illegally in Bhiwandi for 15 years
भिवंडीतून तीन बांगलादेशींना ताब्यात, बनावट आधारकार्डासह शिधापत्रिका, पॅनकार्ड जप्त
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
person who came to Thane for selling whale fish vomit ambergris arrested by thane Polices Crime Investigation Branch
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत
Knife stab in stomach on busy road in Bhiwandi thane news
भिवंडीत भररस्त्यात पोटात भोसकला चाकू; हल्ल्यानंतर जखमीला शिवीगाळ केल्याची विकृती मोबाईल चित्रीकरणात कैद, एकाला अटक
Saif Ali Khan attack case Diamond ring stolen by attacker while working in pub
सैफ अली खान हल्ला प्रकरण : पबमध्ये कामाला असताना हल्लेखोराकडून हिऱ्याच्या अंगठीची चोरी
Thieves arrested, Thieves robbing citizens,
एटीएममधून रोकड काढणाऱ्या नागरिकांना लुटणारे परराज्यातील चोरटे गजाआड
Criminal arrested , stealing two-wheeler ,
पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक; नऊ दुचाकी जप्त

फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी ‘टीसीओसी’ कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे अशी कृत्ये करत असतात. टीसीओसी कालावधी तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दलाने २१ मार्च रोजी भामरागड परिसरात नाकाबंदी सूरू केली होती. क्युआरटी, सीआरपीएफचे जवान व भामरागड पोलीस कर्तव्य बजावत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे निदर्शनास आले. त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता तो कुख्यात नक्षल समर्थक पेका पुंगाटी असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यास अटक केली.

आणखी वाचा- नागपुरात गडकरींच्या प्रचार कार्यालयात शिरण्याचा आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न

१९ डिसेंबर २०२३ रोजी नक्षलवाद्यांनी हिद्दुर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावलेले ३ ट्रॅक्टर, एक जेसीबी पेटवून मजुरांना मारहाण व दमदाटी केली होती. या गुन्ह्यात तो सामील होता. सन २०१६ मध्ये एका पोलीस शिपायाचे अपहरण करुन खून केल्याच्या अनुषंगाने भामरागड येथे दाखल गुन्ह्यात देखील त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तो नक्षलवाद्यांना रेशनचे धान्य पुरविणे, गावातील लोकांना मिटींगसाठी बळजबरी गोळा करणे, सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे करीत होता, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अमर मोहिते व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Story img Loader