नागपूर : राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी वर्गातील कैद्यांचा समावेश आहे. शेतकरी कैद्यांनी शेतीत राबून तब्बल ४ कोटी ५५ लाख रुपयांचे शेतमालाचे उत्पादन घेतले आहे. सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्यांमध्ये पैठण कारागृह पहिल्या स्थानावर असून त्यानंतर विसापूर आणि नागपूर कारागृहाचा क्रमांक लागतो, अशी माहिती पुणे कारागृह महासंचालक कार्यालयाने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यवर्ती कारागृह म्हटले की सामान्य नागरिकांच्या मनात धडकी भरते. कुख्यात गुन्हेगारांचा भरणा असलेल्या कारागृहातील जीवनमानाबाबत विचार केल्यास अंगावर काटा उभा राहू शकतो. मात्र, महाराष्ट्र कारागृह महासंचालकांनी राज्यभरातील कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमधील सुप्त गुणांना वाव दिला आहे. हातून एखादा गुन्हा घडल्यानंतर आरोपीला तुरुंगातील चार भिंतीत आयुष्य जगावं लागते.

हेही वाचा – शाहिद शरीफने पोलिसांना मामा बनवले….मुद्दाम जुने पारपत्र….

बाहेरील जगाशी त्यांचा संबंध तुटतो. मात्र, कारागृहात असताना कैद्यांच्या वागणुकीत बदल व्हावा, सुटकेनंतर त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशासन मदत करते. राज्यातील कारागृहातील कैद्यांकडून शेतीकामासोबत लॉन्ड्री, हातमाग, शिवणकाम, सुतारकाम, लोहारकाम, चित्रकला यासारखी एकूण १८ ते २० प्रकारची कामे कारागृह विभागाकडून करुन घेतली जातात.

राज्य कारागृह प्रशासनाने गेल्या वर्षभरात राज्यातील सर्वच कारागृहातील विशेषकरून शेतीचे काम येत असलेल्या कैद्यांची निवड केली. त्यांच्या हाताला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. राज्याच्या कारागृह विभागाकडे ३३० हेक्टर शेती आहे. त्यामध्ये जवळपास १० ते १५ हजार कैदी शेतीकाम करतात. गेल्या २०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षात राज्यभरातील कैद्यांनी परीश्रम घेऊन ४ कोटी ५५ लाख ५३ हजार रुपयांचा शेतमाल उत्पादित केला. सर्वाधिक शेतमाल उत्पन्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण खुल्या कारागृहातील कैद्यांनी घेतले.

हेही वाचा – नागपुरातील हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या पतीला न्यायालयाकडून पुन्हा दिलासा

पैठण कारागृहातील कैद्यांनी अव्वल स्थान पटकावत १०४ हेक्टर शेतीवर एक कोटी ९० लाखांचे उत्पन्न घेतले आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या विसापूर कारागृहातील कैद्यांनी ६५ लाख ७३ हजार रुपयांचे शेती उत्पन्न घेतले आहे. तिसऱ्या क्रमांकावर नागपूर कारागृहाचा क्रमांक असून २८ लाख ६० हजार रुपयांचे उत्पादन घेतले आहे. नाशिक आणि विसापूर विभागातील कारागृहात ऊस, कापूस, भात, कांदा, पालेभाज्या आणि फळभाज्यांचे पिक घेतल्या जाते. नागपूर कारागृह विभागात गहू, भाजीपाला आणि कंदमुळे अशी पिके घेतली जातात.

कारागृह विभाग – शेतीचे उत्पादन

पश्चिम कारागृह (पुणे) – १.३६ कोटी

मध्य कारागृह (नाशिक) – १.९८ कोटी

पूर्व कारागृह (नागपूर) – १.४ कोटी

दक्षिण कारागृह (ठाणे) – १६ लाख

कारागृहातील कैद्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन कारागृहात विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यात काही कैद्यांकडे शेती करण्याचे कौशल्य आहे. अशा कैद्यांच्या मदतीने कारागृहातील शेती कसून शेतमालाचे उत्पादन घेण्यात येते. गुणवत्तापूर्वक बि-बियाणे आणि सोनखताचा वापर केल्याने हे शक्य झाले आहे. – अमिताभ गुप्ता (पोलीस महासंचालक, राज्य कारागृह विभाग)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jail prisoners produce agriculture product production of about four and a half crores adk 83 ssb
Show comments